देश

रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत : कॅप्टन अमरिंदर सिंग

वृत्तसंस्था

अमृतसर : पंजाबच्या अमृतसर येथे झालेल्या रेल्वे अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची सरकारी मदत देण्यात येईल. तसेच या अपघातात जखमी झालेल्या लोकांवर सरकारी किंवा खासगी रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येईल, अशी माहिती पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिली. तसेच बचावपथक युद्धपातळीवर काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

अमृतसरच्या चौडा बाजार परिसरात दसऱ्याच्या सणानिमित्त रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही लोकं या रेल्वेरूळावरून हा कार्यक्रम पाहत होते. त्यादरम्यान आलेल्या रेल्वेने यातील काही जणांना उडवले. यामध्ये 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. 

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस, रेल्वेचे अधिकारी व वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. अपघातातील जखमींना अमृतसर आणि जवळील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात येत आहे. 

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी आपला नियोजित इस्त्राईल दौरा रद्द केला आणि अमृतसरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची सरकारी मदत तर जखमींना मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT