float above waves Kerala designs a unique bridge  
देश

लाटांवर तरंगता येणारा पूल पाहिलात का? Video Viral

केरळमधील कोझिकोड येथील बेपोर बीचवर तरंगता पूल उभारण्यात आला आहे

सकाळ डिजिटल टीम

केरळमधील कोझिकोड येथील बेपोर बीचवर तरंगता पूल उभारण्यात आला आहे. केरळ पर्यटन विभागाने हा समुद्रावर हा पूल जिल्हा पर्यटक प्रोत्साहन परिषद (डीटीपीसी) आणि बंदरे विभागाच्या मदतीने बांधला आहे.

मनोरामऑनलाइन डॉट कॉमने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, हा पूल 100 मीटर लांब आणि 3 मीटर रुंदीचा आहे. हा फ्लोटिंग ब्रिज हाय-डेन्सिटी पॉलीथिलीन (HDPE) ब्लॉकचा बनलेला आहे. यामुळे समुद्राच्या मध्यभागी पूलवर उभ्या असलेल्या लोकांना तरंगायचा अनुभव घेता येतो. असा आनंद लोकांना घेता यावा यासाठी पुल करताना त्यावर 7 किलो वजनाचे 1300 एचडीपी ब्लॉक वापरले गेले. हे ब्लॉक आवश्यकतेनुसार हलवता येतात. तसेच ते पटकन जोडले जाऊ शकतात. सपोर्ट्स 2 मिनिटांच्या अंतराने कमी पडलेल्या ब्लॉक्समध्ये दिले गेले आहेत.

पूल मजबूत करण्यासाठी त्याला 100 किलो वजनाच्या 31 अँकरने मजबुती दिली आहे. लाट ज्याप्रमाणात येते त्याप्रमाणे पूल उभा राहतो आणि पडतोही. या पुलावरून एकावेळी 500 लोकांना जाता-येता येऊ शकेल. मात्र, सध्या या पुलावर लाईफ जॅकेट घातलेल्या ५० लोकांनाच परवानगी आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 दरम्यान हा पूल नागरिकांना पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT