Rashmi-Jayshankar
Rashmi-Jayshankar 
देश

वर्णद्वेषाकडे डोळेझाक नाही : परराष्ट्र मंत्री जयशंकर

पीटीआय

नवी दिल्ली - ब्रिटिश राजघराण्याची सून मेघन मार्कल हिचा राजघराण्यातील वर्षद्वेषाबाबत जो गौप्यस्फोट केला त्याचा आणि ऑक्‍सफर्डमधील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद सोडण्यास जिला भाग पाडले गेले त्या रश्‍मी सामंत हिच्याबाबत घडलेल्या अन्यायाचे पडसाद आज संसदेच्या वरिष्ठ सभागृहात उमटले. शून्य प्रहरात उपस्थित केलेल्या या विषयावर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी, "ब्रिटनमधील वर्णद्वेषाच्या घटनांवर भारत डोळे मिटून घेऊ शकत नाही,'' असे सूचकपणे सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतातील शेतकरी आंदोलनावर चर्चा करणाऱ्या ब्रिटनच्या संसदेला भारतीय संसदेने दिलेले हे पहिले प्रत्युत्तर मानले जाते. ब्रिटनच्या संसदेने शेतकरी आंदोलनावर केलेल्या चर्चेवर भारताने तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्याच वेळापासून ब्रिटनच्या उपद्‌व्यापांना प्रत्युत्तर देण्यासाठी संसदेत ब्रिटनमधील वंशद्वेषावर चर्चा करावी असा जोरदार मतप्रवाह भाजप खासदारांमध्ये आहे. तशी चर्चा करण्यावर सरकारने अद्याप मौन बाळगले तरी जयशंकर यांनी राज्यसभेत शून्य प्रहरातील विषयालाही स्वतःहून प्रतिसाद देऊन ब्रिटनमधील संसदेत झालेल्या चर्चेवरील भारताची तीव्र नाराजीची भूमिका अधोरेखित केल्याचे मानले जाते.

भाजपचे अश्‍विनी वैष्णव यांनी ब्रिटन राजघराण्याबाबतचा वाद, ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपदच नव्हे तर ब्रिटनही सोडावे लागलेल्या रश्‍मी सामंत या भारतीय विद्यार्थिनीला मिळालेल्या वागणुकीचा मुद्दा उपस्थित केला. सामंत हिला निवडून येऊनही विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तिच्या जुन्या फेसबुक टिप्पणीवरून वाद उफाळल्यावर तिने विद्यार्थ्यांच्या चर्वेल या नियतकालिकाद्वारे जाहीर माफीही मागितली. वैष्णव म्हणाले की इंग्लंडमध्ये स्थलांतरित आशियाई लोकांवर मोठा अन्याय व भेदभाव होत आहे. कोवीड उपचारांबाबतही हेच चित्र दिसते.

भारत वर्णद्वेषाबाबत डोळे मिटून घेऊ शकत नाही. भारताचे ब्रिटनबरोबर मजबूत संबंध आहेत. ब्रिटनबरोबरच्या चर्चेत योग्य वेळी भारताच्या वतीने हे मुद्दे उपस्थित केले जातील. गरज भासल्यास मोठ्या व्यासपीठावरूनही भारत हे मुद्दे मांडेल. ऑक्‍सफर्डसारख्या घटनांवर भारताचे    बारीक लक्ष आहे. कोणत्याही प्रकारच्या असहिष्णुतेच्या विरोधातील भारताची ठाम भूमिका कायम आहे.
- एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT