File Photo
देश

काश्मीरच्या एका गावात ढगफुटी, चौघांचा मृत्यू, ३० बेपत्ता

लष्कर आणि पोलिसांचे पथक मदतीसाठी घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले आहे, अशी माहिती किश्तवाडचे जिल्हा दंडाधिकारी अशोक कुमार शर्मा यांनी दिली.

दीनानाथ परब

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या (jammu-kashmir) किश्तवाड जिल्ह्यात दुर्गम भागात असणाऱ्या गावामध्ये ढगफुटी (cloudburst) झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा जास्त नागरिक बेपत्ता आहेत. किश्तवाड (Kishtwar district) जिल्ह्यातील डाच्चान तालुक्यातील होनझार गावात (honzar village) बुधवारी पहाटेच्या सुमारास ही ढगफुटी झाली. हे गाव रस्ते मार्गाने जोडलेले नाहीय. (four dead over 30 missing after cloudburst in Jammu Kashmirs Kishtwar IAF to join rescue ops dmp82)

"ढिगाऱ्याखालून आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आठ ते नऊ घरांचे नुकसान झाले आहे. लष्कर आणि पोलिसांचे पथक मदतीसाठी घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले आहे" अशी माहिती किश्तवाडचे जिल्हा दंडाधिकारी अशोक कुमार शर्मा यांनी दिली. इंडियन एअर फोर्सला किश्तवाडमधील बचाव मोहिमेत स्थानिक पथकांना मदत करण्यास सांगण्यात आले आहे, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

मागच्या काही दिवसांपासून जम्मूमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. जुलै अखेरपर्यंत आणखी पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन किश्तवाड प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

"पुढच्या काही दिवसात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नदी आणि नाल्यामधील पाणी पातळी वाढू शकते. नदी किनारी राहणाऱ्या लोकांसाठी हा धोका आहे" असे जिल्हा प्रशासनाने मंगळवारी रात्री जारी केलेल्या अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT