Four People Frozen To Death google
देश

कॅनडा-अमेरिका सीमेवर चौघांचा गोठून मृत्यू, भारतातील या गावाची चिंता वाढली

सकाळ डिजिटल टीम

बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांचा कॅनडा-अमेरिका सीमेवर (Canada America Border) गोठून मृत्यू झाला. या घटनेनंतर गुजरातमधील गांधीनगर (Gandhinagar Gujrat) जिल्ह्यातील एका गावाची चिंता वाढली आहे. कारण, मृत्यू झालेले चार जण याच गावातील बेपत्ता झालेल्या नागरिकांपैकी असल्याचे समोर आले आहे. पण, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

अमेरिका-कॅनडा सीमेजवळील मिनेसोटा राज्यात 19 जानेवारीला अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या लोकांच्या एका गटाला ताब्यात घेतले आणि त्यातील चौघांचा कडाक्याच्या थंडीने मृत्यू झाला. तसेच गांधीनगर जिल्ह्यातील कलोल तहसलीमधील डिंगुचा गावातील एक 39 वर्षीय पुरुष, त्याची 37 वर्षीय पत्नी आणि त्यांची 17 वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा हे चौघे बेपत्ता आहेत. मृत्यू झालेले चौघे बेपत्ता असलेल्या लोकांसोबत मिळतेजुळते असल्याचं पोलिस आणि ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

गावचे सरपंच माथुरजी यांना कुटुंबाच्या प्रवासाबाबत माहिती आहे का? त्या कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांना ओळखतात का? असं नरदीपूर पोलिसांनी विचारले. मात्र, आम्ही विदेशात प्रवास करणाऱ्या लोकांची नोंद ठेवत नाही, असं सरपंच ठाकोर यांनी पोलिसांना सांगितलं.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब सोमवारी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला गेले होते. ही त्यांची पहिली परदेश भेट होती आणि बुधवारपासून ते त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात नव्हते. त्याच दिवशी अमेरिकेच्या सीमेवर कॅनडाच्या इमर्सन शहराजवळ चार मृतदेह सापडले.

पोलिसांना अद्याप परराष्ट्र मंत्रालयाकडून मृत लोकांच्या ओळखीबाबत कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नाही. तसं आम्ही ग्रामस्थांना देखील सांगितलं आहे, असं गांधीनगरचे जिल्हाधिकारी कुलदीप आर्य यांनी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना सांगितले. आमच्या नोंदीनुसार, कुटुंब व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला गेले होते. आमच्या एका पथकाने गावाला भेट दिली. त्यावेळी असे आढळले की तेथे पाच जणांचे एक कुटुंब आहे, त्यापैकी चार जण आजोबांना सोडून कॅनडाला गेले होते. आजोबा आता आपल्या धाकट्या भावाकडे राहण्यासाठी अहमदाबादला गेले असल्याचे आम्हाला समजले, असे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. के. देसाई यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT