Truck Accident at Ramnagar esakal
देश

Road Accident : मालवाहू गाडीच्या धडकेत चार शाळकरी मुलं ठार, तीन जखमी; शिकवणी संपवून घरी परतताना दुर्घटना

मुले शिकवणी संपवून घरी जात असताना मालगाडीची धडक बसली

सकाळ डिजिटल टीम

मृत मुलांच्या कुटुंबीयांना आवश्यक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

बंगळूर : रामनगर जिल्ह्यातील गोल्लरदोड्डी येथे मालवाहू वाहनाने शाळकरी मुलांना (School Children) धडक दिल्याने झालेल्या अपघातातील मृतांची संख्या चार झाली. याप्रकरणी गंभीर जखमी झालेल्या आणखी एका मुलीचा रविवारी (ता. २०) रात्री मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध ठेवून ठिय्या आंदोलन केले.

ही मुले शिकवणी संपवून घरी जात असताना मालगाडीची धडक बसली. आणखी तीन मुले गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी झाला होता. दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला होता. एक मुलगा गंभीर जखमी होता, त्याचा तीन दिवसांनी मृत्यू झाला. त्यानंतर काल ७ वर्षीय ज्ञानवी हिचा मृत्यू झाला.

तिच्यावर बंगळूर येथील इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ चेस्ट डिसीज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मुलीचा मृतदेह रामनगर-मागडी रस्त्यावर ठेवून कुटुंबीय, नातेवाईक व स्थानिकांनी निषेध केला. चार मुलांचा बळी घेणाऱ्या वाहनचालकाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन गाऱ्हाणे ऐकून घेतले.

मृत मुलांच्या कुटुंबीयांना आवश्यक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. माजी मुख्यमंत्री आणि धजद नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि राज्य सरकारला अशा दुर्घटनांना कारणीभूत असलेल्या बेदरकारपणे वाहन चालविण्याविरुद्ध कारवाई करण्याची आणि शाळकरी मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची विनंती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT