देश

न्यायाधीशांचे स्वातंत्र्य मौनातच : सरन्यायाधीश गोगोई

पीटीआय

नवी दिल्ली : न्यायसंस्था आणि न्यायाधीशांनी त्यांचे स्वातंत्र्य उपभोगताना मौन बाळगणे आवश्‍यक आहे, असा सल्ला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायसंस्था आणि सहकाऱ्यांना आज (शुक्रवार) दिला.

सरन्यायाधीश गोगोई (वय 64) यांचा न्यायालयीन कामकाजाचा आज शेवटचा दिवस होता. त्याप्रसंगी आयोजित समारंभात गोगोई बोलत होते. रंजन गोगोई हे न्यायालय क्र.1 मध्ये ते चार मिनिटे बसले. त्यांचे उत्तराधिकारी न्या. शरद बोबडे त्यांच्या बाजूला बसले होते. आपल्या कार्यकाळात प्रसारमाध्यमांनी केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. त्यांच्याकडे असलेल्या सर्व दहा खटल्यांबद्दल त्यांनी नोटीस जारी केली.

सरन्यायाधीश गोगोई यांच्या वतीने एक निवेदन सादर करण्यात आले. त्यात त्यांनी म्हटले आहे, की वकिलांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे आणि ते असणे अपेक्षित आहे. न्यायालयाच्या पीठाच्या न्यायाधीशांनी मौन बाळगणे आवश्‍यक आहे. याचा अर्थ असा नाही की न्यायाधीशांनी बोलू नये, तर जेव्हा आवश्‍यकता असेल, तेव्हा बोलणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. मात्र, त्यापलीकडे त्यांनी मौन बाळगणेच चांगले.

गुंता सुटला, आता शरद पवार-सोनिया गांधी अंतिम बैठक
 
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी पहिल्यांदा पत्रकार परिषदेत घेत त्यांचे विचार मांडले. यात गोगोई यांचाही समावेश होता. या घटनेवर बोलताना ते म्हणाले, की प्रसारमाध्यमांना सामोरे जाण्याचा विचार हा माझ्यासाठी कधीही पर्यायाच्या रूपात नव्हता. मी अशा एका संस्थेशी निवड केली, जिची ताकद सार्वजनिक विश्‍वास आणि भरवशावर आधारित आहे. 

मुलाखतीस नकार

कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मुलाखत देण्याची विनंती गोगोई यांना अनेक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी केली होती. मात्र, त्यांनी विनंती मान्य करू शकत नसल्याचे स्पष्ट करीत त्यांनी निवेदन प्रसिद्ध केले. आपल्या पूर्ण कार्यकाळात प्रसारमाध्यमांनी केलेल्या सहकार्याबद्दल गोगोई यांनी आभार मानले. कठीण काळात प्रसारमाध्यमांनी जी परिपक्वता दाखविली, त्याबद्दल त्यांनी कौतुक केले. 

वकिलांच्या संघटनेकडून निरोप

सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खन्ना यांनी सरन्यायाधीश गोगोई यांना निरोप देत निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. बार असोसिएशनच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढविल्याबद्दल खन्ना यांनी गोगोई यांना धन्यवाद दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT