Funeral mother in law surat gujarat Funeral mother in law surat gujarat
देश

सुनेने केले सासूचे अंत्यसंस्कार; मुलगा म्हणाला...

सकाळ डिजिटल टीम

सुरत : पारंपरिक चालीरीती मोडीत काढत गुजरातमधील सुरत शहरातील ३८ वर्षीय सुनेने सासूचा अंत्यसंस्कार (Funeral) केला. खरे तर हिंदू प्रथा पारंपरिकपणे स्त्रियांना स्मशानभूमीत जाण्यास किंवा अंत्यसंस्कारात भाग घेण्यास मनाई आहे. परंतु, सावनी कुटुंबाला ही परंपरा बदलायची होती.

मावजी सवानी यांचे कुटुंबीय घरातील महिलांना अंत्यसंस्कारासाठी उमरा स्मशानभूमीत घेऊन गेले. सावनी यांच्या पत्नी वसंतबेन यांचे यकृताच्या दीर्घ आजाराने वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. एक महिन्यापूर्वी त्यांचे यकृत प्रत्यारोपणही झाले होते. विद्युत शवागारात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृताची मुलगी भावना, सून पूर्वी यांनी अंत्यसंस्कार (Funeral) केले.

गेली अनेक वर्षे आईप्रमाणे सासूची सेवा केली. त्यामुळे मलाही त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहायचे होते, असे सून पूर्वी म्हणाल्या. वसंतबेन यांचा मुलगा धर्मेंद्र सवानी म्हणाला, पत्नीची इच्छा होती की तिने माझ्या आईच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहावे. कारण, तिनेच सेवा केली. तो पूर्वीचा अधिकार होता आणि घरातील सदस्यांनी ते मान्य केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Tukaram Mundhe: बोगस दिव्यांगांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाई होणार?

World Record : भारताने मोडला रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात अशी अविश्वसनीय कामगिरी करणारी पहिली टीम

Viral Video: धावत्या ट्रेनमधील स्टंटवर नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले धाडस की..! पाहा व्हायरल व्हिडिओ

IND vs PAK: भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचं 'धुरंधर' स्टाईल सेलिब्रेशन अफगाणिस्तान अन् बलुचिस्तानमध्ये? Video होतायेत Viral

SCROLL FOR NEXT