Congress Team eSakal
देश

मंत्रीपदं भोगताना तुमचा विचार कुठे होता? G23 वर संतापले अधीर रंजन चौधरी

"सोनिया गांधी सर्वांशी बोलण्यास तयार, पण..."; खासदार अधीर रंजन चौधरींनी व्यक्त केली खंत.

सुधीर काकडे

पाच राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी निवडणुकीनंतर काही मोठे निर्णय घेत, पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे घेतले. तर दुसरीकडे जी-२३ मधील नेत्यांनी आपली वेगळी भुमिका मांडल्याने पक्षात गृहकलह निर्माण झाला आहे. याच सगळ्या वादावर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोनिया गांधी काँग्रेसमधील प्रत्येकाशी बोलण्यासाठी तयार आहेत. मात्र एकत्र लढण्याची गरज असताना काही राजकारणी (G23 नेते) पक्षाविरोधात विधानं करत आहेत. जर त्यांचा हेतू योग्य असेल तर ते सोनिया गांधींशी का बोलत नाहीत? असा सवाल चौधरी यांनी केला आहे. जेव्हा या राजकारण्यांना यूपीए सरकारमध्ये मंत्री करण्यात आलं, तेव्हा त्यांनी लोकशाही प्रक्रियेचा विचार करून पदं द्यावीत, असं सांगितलं होतं का? तेव्हा सर्व काही आलबेल होतं कारण आम्ही सत्तेत होतो. राजकीय पक्षाला चढ-उतार पाहावेच लागतात, याचा अर्थ बंडखोरी करावी असा होत नाही, असं परखड मत अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT