Rape Case sakal
देश

धक्कादायक! रेल्वे स्टेशनवर दिव्यांग अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पिडीत तरुणी तिच्या एका मित्रासोबत घरातून पळून आली होती

सकाळ डिजिटल टीम

रेल्वे स्टेशनवर एका 17 वर्षीय दिव्यांग मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हा प्रकार सुरत रेल्वे स्टेशनवरील असून या प्रकरणी सुरत रेल्वे पोलिसांनी आरोपींना अटक केली. हि अल्पवयीन पिडीत तरुणी एका 18 वर्षीय मित्रासोबत घरातून पळून आली होती.(gangrape of 17 years disabled girl at Surat railway station)

पोलिसांच्या माहितीनुसार या दोघांनी घरातून पळून आल्यानंतर आपल्या उदर्निर्वाहासाठी प्रयत्न सुरू केले होते. यावरुनच रेल्वे स्टेशन वरील सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या दोन तरूणांनी पैसे कमवायचे असेल तर रात्रीच्या वेळी रेल्वे स्टेशनच्या आरक्षण केंद्रावर रांगेत उभे राहण्यास सांगितले होते.

यानंतर २२ मे रोजी रात्री तरुण १७ वर्षीय तरुणीला रेल्वे स्टेशन वर सोडून रेल्वे स्टेशनच्या आरक्षण केंद्रावर रांगेत उभे राहायला गेला. मात्र या दरम्यान दोन नराधमांनी डाव साधला आणि तरुणीवर बलात्कार केला.

२३ मे रोजी मुलीचा मित्र परत आला तेव्हा तरुणीने त्याला संपुर्ण प्रकार सांगितला. याप्रकरणी तरुणाने पोलिसात गुन्हा दाखल केला आणि चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपीस अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT