Rahul Gandhi on Adani Esakal
देश

Rahul Gandhi on Adani: "इंडोनेशियामध्ये कोळसा विकत घेतात अन्..."; राहुल गांधींचा अदानींवर ३२ कोटींचा नवा आरोप

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला

Sandip Kapde

Rahul Gandhi on Adani:

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत गौतम अदानी यांचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. परदेशी वृत्तपत्र फायनान्शियल टाईम्सचा हवाला देत राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी गौतम अदानींवर ३२ करोड रुपयांचा घोटाळा केला. राहुल गांधी म्हणाले, "यापूर्वी आम्ही २० हजार करोड रुपयांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. हा पैसा कुणाचा होता आणि कुठून आला होता. मात्र समोर आले आहे की २० हजार करोडचा आकडा चुकीचा आहे. यामध्ये आणखी १२ हजार कोटींची भर पडली असून एकूण आकडा ३२ हजार कोटी झाला आहे."

राहुल गांधी म्हणाले, "वाढत्या वीज बिलामागे अदानी ग्रृपचा हात आहे.अदानी इंडोनेशियामध्ये कोळसा विकत घेतात आणि भारतात त्याचा दर दुप्पट होतो. ते कोळशाच्या किंमतीचे चुकीचे वर्णन करतात.

"लोक विजेचे स्विच चालू करताच अदानींच्या खिशात पैसे जातात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानींना संरक्षण देत आहेत. भारतात अदानीला कोरा चेक देण्यात आला आहे. त्यांना हवे ते करू शकतात. 32 हजार कोटींचा आकडा जनतेने लक्षात ठेवावा. जगातील इतर देशांमध्येही तपास सुरू आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांची चौकशी का होत नाही?," असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

अदानींना जे हवे ते मिळते. अदानीमध्ये असे काय आहे की सध्याचे मोदी सरकार अदानींची चौकशी करू शकत नाही, यामागे कोणती ताकद आहे? ही ताकद संपूर्ण देशाला माहीत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT