General Knowledge esakal
देश

General Knowledge : ट्रेन चालवण्यासाठीसुद्धा ड्रायव्हिंग लायसन्स लागतं का? लोको पायलट कसे बनतात? वाचा

लोको पायलट पदासाठी अर्ज करण्यापूर्वी परवाना असणे अनिवार्य आहे का? याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

साक्षी राऊत

General Knowledge : भारतात कार, बस किंवा ट्रक चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते हे सगळ्यांनाच माहितीये. ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवणे हा दंडनीय गुन्हा आहे. विमान उडवण्यासाठी पायलटकडेसुद्धा परवाना असणे आवश्यक आहे. आता प्रश्न पडतो की भारतात ट्रेन चालवायची असेल तर आधी ड्रायव्हिंग लायसन्स असावं लागतं का? लोको पायलट पदासाठी अर्ज करण्यापूर्वी परवाना असणे अनिवार्य आहे का? याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

भारतीय रेल्वेच्या गाड्या चालवणार्‍या लोको पायलट्सना भरतीपूर्वी कुठूनही ट्रेन चालवण्‍यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स मिळणे आवश्‍यक नाही किंवा देशात कुठेही लोको पायलटसाठी परवाने बनवले जात नाहीत. रेल्वे सहाय्यक लोको पायलटची भरती करते. मग ट्रेन ड्रायव्हिंग स्कूलमध्ये भरती झालेल्या तरुणांना ट्रेनिंग देऊन ते ट्रेन चालवण्यास सक्षम बनवतात.

लोको पायलट कसे बनतात?

असिस्टंट लोको ड्रायव्हर पदासाठी भरती रेल्वे भर्ती बोर्डाद्वारे केली जाते. ही नियुक्ती लेखी चाचणी, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणीनंतर केली जाते. असिस्टंट लोको पायलट भरती झालेल्या तरुणांना प्रशिक्षण शाळेत पाठवले जाते. ट्रेनिंग स्कूलमध्ये त्यांना ट्रेनचे इंजिन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

येथे त्यांना फक्त ट्रेन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही तर ट्रेनचे इंजिन, रेल्वे ट्रॅक आणि डब्यांची संपूर्ण माहिती दिली जाते. प्रशिक्षणानंतर विभागीय यांत्रिक अभियंता किंवा विभागीय विद्युत अभियंता यांची चाचणी घेतली जाते. उत्तीर्ण झालेल्यांना योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांना ट्रेन चालवण्याची संधी दिली जाते.

आधी त्यांना मालगाडी चालवायला लावतात?

लोको पायलट्सना थेट पॅसेंजर ट्रेन चालवू दिली जात नाही. आधी त्यांना मालगाडी चालवायला दिली जाते. पॅसेंजर ट्रेनमध्ये हजारो प्रवासी असल्याने हे केले जाते. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन, केवळ अनुभवी लोको पायलटनाच ते चालवण्याची परवानगी आहे. मालगाडी चालवल्यानंतर पॅसेंजर ट्रेनमधील लोको पायलटच्या देखरेखीखाली सहाय्यक लोको पायलटला ट्रेन चालवायला दिली जाते. काही काळ अशा देखरेखीखाली ट्रेन चालवण्याचा अनुभव मिळाल्यावरच त्यांना स्वतंत्रपणे ट्रेन चालवण्याची परवानगी दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT