Narawane 
देश

मराठमोठ्या नरवणेंनी स्वीकारला लष्करप्रमुख म्हणून पदभार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लष्कराचे उपप्रमुख असलेल्या मराठमोठ्या लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद (एम. एम.) नरवणे यांनी आज (मंगळवार) लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. माजी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे आज निवृत्त झाले असून, त्यांना सरसेनाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. 

लेफ्टनंट जनरल नरवणे लष्कराचे स्वातंत्र्यानंतरचे 28वे प्रमुख आहेत. लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती होण्यापूर्वी लेफ्टनंट जनरल नरवणे हे पूर्व विभागाचे प्रमुख होते. चीनबरोबरच्या सुमारे चार हजार किलोमीटर लांबीच्या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी पूर्व विभागावर आहे. आपल्या 37 वर्षांच्या सेवेत लेफ्टनंट जनरल नरवणे यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. 

जम्मू-काश्‍मीरमध्ये त्यांनी राष्ट्रीय रायफल्सच्या बटालियनचे, तर पूर्व आघाडीवर एका पायदळ ब्रिगेडचे नेतृत्व केले आहे. दहशतवादाचा प्रभाव असलेल्या जम्मू-काश्‍मीर आणि ईशान्य भारतातही त्यांनी काम केले आहे. श्रीलंकेत पाठविण्यात आलेल्या भारतीय शांती सेनेत (आयपीकेएफ) त्यांचा समावेश होता, तसेच म्यानमारमधील भारतीय वकिलातीत संरक्षण सल्लागार म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. 

लेफ्टनंट जनरल नरवणे हे पुण्याजवळच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) छात्र असून, डेहराडूनच्या भारतीय लष्करी अकादमीत (आयएमए) त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. जून 1980 मध्ये ते शीख लाइट इन्फंट्री रेजिमेंटच्या सातव्या बटालियनमध्ये दाखल झाले. जम्मू-काश्‍मीरमधील विशेष कामगिरीबद्दल त्यांना सेना पदकाने (विशेषोल्लेख) गौरविण्यात आले आहे. तसेच, नागालॅंडमधील आसाम रायफल्सचे (उत्तर) महानिरीक्षक (मेजर जनरल) असताना केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना विशिष्ट सेवापदक तसेच एका स्ट्राइक कोअरच्या नेतृत्वाबद्दल अतिविशिष्ट सेवा पदकाने लेफ्टनंट जनरल नरवणे यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT