rape case  File photo
देश

लाँग ड्राइव्हच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला फ्लॅटवर नेऊन सामूहिक बलात्कार

एक आरोपीने मुलीला तिच्या घराजवळ असलेल्या मंदिराच्या इथे भेटण्यासाठी बोलावले. तिथून आरोपी तिला जवळच्या पार्कमध्ये (park) घेऊन गेला.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: लाँग ड्राइव्हला (Long drive) नेण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीला फ्लॅटवर (flat) नेऊन चौघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार (gang rape) केला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून एक जण फरार आहे. पीडित मुलगी ज्या मुलासोबत गेली, त्याला ती ओळखत होती. २७ जुलैला एक आरोपीने मुलीला तिच्या घराजवळ असलेल्या मंदिराच्या इथे भेटण्यासाठी बोलावले. तिथून आरोपी तिला जवळच्या पार्कमध्ये (park) घेऊन गेला व त्याच्या तीन मित्रांसोबत ओळख करुन दिली. (Ghaziabad girl gang rape in Delhi flat dmp82)

त्यानंतर चारही आरोपींनी त्यांच्यासोबत लाँग ड्राइव्हला येण्यासाठी मुलीला राजी केले. पण ते तिला दिल्लीच्या कोंदली भागातील फ्लॅटवर घेऊन गेले व तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रारीत ही माहिती दिली आहे. ते एका खासगी कंपनीत क्लार्क आहेत. चारही आरोपी विशीतील आहेत.

आरोपींनी तिला घराजवळच्या मुख्य रस्त्यावर सोडले व घडलेल्या प्रकाराबद्दल कुठे वाच्यता केली, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. पीडित मुलीने नंतर घडलेल्या प्रकाराबद्दल आपल्या आई-वडिलांना सांगितले. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार नोंदवली.

मुलीच्या कुटुंबीयांना तक्रार नोंदवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. इतक्या गंभीर प्रकरणात पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, पोलीस गुन्हा नोंदवायला टाळाटाळ करत होते, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT