asaduddin owaisi main.jpg 
देश

हैदराबाद महापालिका निवडणुकीत एमआयएमचा स्ट्राइक रेट 86 टक्के, किंगमेकरच्या भूमिकेत ओवेसी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या (जीएचएमसी) निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) सर्वाधिक 56 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परंतु, त्यांना बहुमत मिळू शकलेले नाही. भाजपने जबरदस्त मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसींचा पक्ष एमआयएमने 44 जागा मिळवल्या तर काँग्रेसला मात्र दोनच जागा मिळाल्या आहेत. 

आकडेवारीवर नजर टाकल्यास ओवेसींच्या पक्षाचा स्ट्राइक रेट सर्वात चांगला आहे. ओवेसींनी 150 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत केवळ 51 जागांवर उमेदवार उतरवले होते. यातील 44 जागांवर विजय नोंदवण्यात त्यांना यश आले. म्हणजे ओवेसींचा स्ट्राइक रेट 86 टक्क्यांपेक्षा जास्त राहिला. तर टीआरएसला गतवेळीपेक्षा 33 जागा कमी मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसला 2016 मधील निवडणुकीच्या तुलनेत 40 टक्के जागा कमी मिळाल्या आहेत. 

2016 च्या जीएचएमसी निवडणुकीत सत्ताधारी तेलंगणा राष्ट्रीय समितीने 99 जागा जिंकल्या होत्या आणि महापौरपद मिळवले होते. तेव्हा भाजपला अवघ्या 4 आणि ओवेसींच्या एमआयएमला 44 जागा मिळाल्या होत्या. भाजपने आक्रमक प्रचार करत हिंदू कार्ड खेळत हैदराबादमध्ये जबरदस्त विजय नोंदवला आणि आपली ताकद 12 पट वाढवली. 2018 मध्ये 117 जागांसाठी झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भाजपने 100 उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांचे केवळ दोन आमदार विजयी झाले होते. मात्र, दोन वर्षांत पक्षाने दक्षिणेकडील राज्यात मुसंडी मारली आहे. 2023 च्या निवडणुकीत भाजप टीआरएससमोर मोठे आव्हान उभा करु शकतो. 

हैदराबाद महापालिका आता त्रिशंकू अवस्थेत आली आहे. त्यामुळे आता हैदराबादचा महापौर कोणत्या पक्षाकडे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने टीआरएसचे प्रचंड नुकसान केले आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना धोका आहे. त्यामुळे टीआरएस महापौरपदासाठी भाजपला साथ देण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे ओवेसींनी निकाल समोर येताच टीआरएसला पाठिंबा देण्याचे सूचक वक्तव्य केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT