Ghulam Nabi Azad News  esakal
देश

Ghulam Nabi Azad : काँग्रेस सोडल्यानंतर आझादांची जम्मूमध्ये आज पहिलीच जाहीर सभा

माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी नुकतेच काँग्रेससोबतचे जुने संबंध तोडले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी नुकतेच काँग्रेससोबतचे जुने संबंध तोडले आहेत.

Ghulam Nabi Azad News : जम्मू-काश्मीरचे (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी अलीकडंच काँग्रेससोबतचे (Congress) 5 दशकांचे जुने संबंध तोडले आहेत. गुलाम नबी आझाद आज (रविवार) जम्मूमधून आपल्या नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणार आहेत. त्यामुळं माजी मुख्यमंत्री आझाद यांची आज 4 सप्टेंबर रोजी सैनिक कॉलनीत (Sainik Colony) जाहीर सभा होणार आहे.

जम्मूत होणाऱ्या या सभेची सर्व तयारी पूर्ण झालीय. सार्वजनिक सभेच्या ठिकाणी 20,000 हून अधिक लोकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आलीय. खरं तर आज होणारी ही रॅली अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण, आझाद आज आपल्या नव्या पक्षाची घोषणा करू शकतात. माजी मंत्री जीएम सरुरी (GM Saruri) यांनी सांगितलं की, 'आझाद यांचं आज सकाळी दिल्लीहून आगमन झाल्यावर त्यांचं भव्य स्वागत केलं जाईल. त्यानंतर सार्वजनिक सभेच्या ठिकाणी त्यांची मिरवणूक काढण्यात येईल.' आझाद यांच्या समर्थनार्थ काँग्रेसमधून राजीनामा देणाऱ्या दोन डझनहून अधिक आमदारांमध्ये सरुरी यांचाही समावेश आहे.

गुलाम नबी आझाद यांनी 26 ऑगस्टला काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यासोबतच आझाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. आझाद यांच्या राजीनाम्यानंतर माजी उपमुख्यमंत्री, 8 माजी मंत्री, एक माजी खासदार, 9 आमदार, पंचायतराज संस्थानचे सदस्य, जम्मू-काश्मीरमधील नगरपरिषद आणि तळागाळातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगर- मनमाड महामार्गाच्या कामाला सुरुवात

Sharad Pawar: राज ठाकरेंसाठी शरद पवार आग्रही; काँगेसलाही दिला मेसेज, उद्धव ठाकरेंची भूमिका काय?

Pay and Park Issue : इस्कॉन मंदिराजवळील ‘पे अँड पार्क’मध्ये वाहनचालकांची लूट; महापालिकेच्या भक्तिवेदांत पार्किंगमधील प्रकार

Horoscope Prediction 2025: उद्या तयार होतोय केंद्र त्रिकोण योग, शनिदेवाच्या आशीर्वादाने मेष अन् मिथुनसह 'या' 5 राशींचे उजळेल भाग्य

SCROLL FOR NEXT