amit shah g1 
देश

मोदींना एक संधी द्या, 5 वर्षात 'सोनार बांगला' करुन दाखवू; अमित शहांची साद

सकाळन्यूजनेटवर्क

कोलकाता- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज पश्चिम बंगालमधील दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. शहांनी बोलपूर येथे भव्य असा रोडशो केला. यावेळी लोकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मी अशा प्रकारचा रोडशो माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. या रोडशोने पश्चिम बंगालचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर किती प्रेम करतात हे दाखवून दिलं आहे. पश्चिम बंगालच्या लोकांना बदल हवा आहे, असं अमित शहा सभेला संबोधित करताना म्हणाले.

आपल्या आशीर्वादानं सरकारनं एक वर्ष पूर्ण केलं, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला 

रोडशोमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जनतेमध्ये किती रोष आहे हे दिसून येतं. पंतप्रधान मोदींना केवळ एक संधी द्या, आम्ही तुम्हाला 5 वर्षात 'सोनार बांगला' करुन दाखवू, असं केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले. अमित शहांचा रोडशो बिरभूम जिल्ह्यातील बोलपूर येथे होत आहे. रोडशो हनुमान मंदिर स्टेडियममधून सुरु झाला असून तो बोलपूर सर्कलपर्यंत असेल.

अमित शहा यांनी बीरभूममधील शांती निकेतनलाही भेट दिली. अमित शहांच्या स्वागतासाठी याठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याआधी त्यांनी येथील रविंद्र भवनमध्ये जाऊन रविंद्रनाथ टेगोर यांना श्रद्धांजली वाहिली. अमित शहा दोन दिवसीय बंगाल दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी तृणमूलच्या अनेक बड्या नेत्यांचा भाजप प्रवेश करुन घेतला. तसेच ममतादीदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यात चांगलाच जोर लावला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. ममतादीदी, निवडणुकीपर्यंत पक्षात तुम्ही एकट्याच राहाल, अशी बोचरी टीका अमित शहांनी शनिवारी सभेत बोलताना केले होती. 

दिल्लीत शेतकरी नाही, खलिस्तान आणि पाकिस्तानचे नारे लावणारे लोक; BJP आमदाराचं...

पश्चिम बंगालमध्ये सीमेपलिकडील लश्कर ए तोएबा आणि अल कायदा यांचे नेटवर्क पसरले आहे का? याचा तपास करा, असे अमित शहांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचे वृत्त आहे. एनआयएचे DIG दीपक कुमार यांच्याकडे शहांनी यासंदर्भातील तपासाचा अहवाल मागवला आहे. सप्टेंबरमध्ये एनआयए (NIA)ने उत्तर 24 परगनाच्या बदुरियामध्ये लश्करच्या एका मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. तर नोव्हेंबरमध्ये अल कायदाच्या "पाकिस्तान प्रायोजित मॉड्यूल"चाही पर्दाफाश करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषद लैंगिक छळ प्रकरणाची चौकशी पूर्ण, राज्य महिला आयोगाला पाठवणार अहवाल

SCROLL FOR NEXT