Goa Chief Minister Pramod Sawant  
देश

गोव्यात 5 दिवस लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

सकाळ डिजिटल टीम

पणजी - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पाच दिवसांचे लॉकडाऊन उद्यापासून लागू करण्यात येणार आहे. गोवा हे कर्नाटकनंतर दुसरं भाजपशासित राज्य आहे जिथं लॉकाडाऊन करण्यात आलं आहे.

गोव्यातील सार्वजनिक वाहतूक पूर्ण बंद राहील. मात्र उद्योगधंदे सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 29 एप्रिल ते 3 मे या कालावधीत हा लॉकडाऊन असणार आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये. सर्व अत्यावश्यक सेवा आणि किराणा मालाची दुकाने सुरु राहतील. स्थलांतरीत मजुरांनी राज्य सोडू नये असंही आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं आहे.

लोकांनी जर पुढचे पाच दिवस कडक लॉकडाऊनचे पालन केले तर संसर्गाची साखळी तोडण्यात आपल्याला यश मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले. लॉकडाऊनची सविस्तर नियमावली लवकरच जाहीर करू असंही त्यांनी सांगितलं. कॅसिनो, बार लॉकडाऊनच्या कालावधीत बंद राहतील. तर रेस्टॉरंट फक्त पार्सल सुविधा देऊ शकतात. अत्यावश्यक सेवांसाठी राज्यात येण्यास किंवा जाण्यासाठी बंदी नसेल असंही सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli: रुट-स्मिथचं शतक पाहाताच विराटच्या कसोटी निवृत्तीवर संतापले संजय मांजरेकर; म्हणाले, 'वनडे सोपं, पण त्याने ...'

Junnar News : "दारू पिऊ नको" म्हटल्याचा राग आला; भावाशी वाद घालून तरुणाने संपवले जीवन!

Latest Marathi News Live Update : धुळ्यातील सभेतून फडणनवीसांचा विरोधकांवर घणघात

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी अकोल्यात; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रचार सभा!

१७ अभिनेत्यांनी कथा ऐकूनच दिला नकार; असा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट ज्याचा शेवट पाहून हादरलेले प्रेक्षक; ठरला मोठा हिट

SCROLL FOR NEXT