government employees Protest against the murder of a bank manager government employees Protest against the murder of a bank manager
देश

सरकारी कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने; बँक व्यवस्थापकाच्या हत्येचा निषेध

सकाळ डिजिटल टीम

कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी गुरुवारी (ता. २) बँक व्यवस्थापक विजय कुमार यांची गोळ्या झाडून हत्या (murder) केली. विजय हे राजस्थानचे रहिवासी आहे. एक व्यक्ती बॅग घेऊन बँकेत शिरला आणि बंदूक काढून केबिनच्या दिशेने गोळीबार केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. मंगळवारी कुलगाममध्येच सरकारी शाळेतील शिक्षिका रजनी बाला यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेचा सरकारी कर्मचाऱ्यांनी निषेध (Protest) व्यक्त केला आहे. (government employees Protest against the murder of a bank manager)

कुलगाममध्ये बँक व्यवस्थापकाच्या हत्येनंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी निदर्शने (Protest) केली. यापूर्वी रजनी बाला यांच्या हत्येनंतरही लोकांमध्ये रोष होता. सरकारने ठोस पावले उचलली नाहीत तर येथून पळ काढू, असे लोक म्हणाले. अल्पसंख्याक, नागरिक आणि सरकारमधील लोकांना लक्ष्य करणारे लोक फक्त भीती पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण, स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या आदेशाला प्रतिसाद देणे बंद केले आहे, असे जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी मागे सांगितले होते.

या घटनेपूर्वी जानेवारीपासून काश्मीर खोऱ्यात पोलिस अधिकारी, शिक्षक आणि सरपंचांसह किमान १६ टार्गेट किलिंगच्या (murder) घटना घडल्या आहेत. कुलगाममध्ये या घटनेच्या ४८ तास आधी सरकारी शिक्षिका रजनी यांची हत्या करण्यात आली होती. तर यापूर्वी बडगाममध्ये राहुल भट या कर्मचाऱ्याची तहसील परिसरात घुसून हत्या करण्यात आली होती.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून कुलगाम, जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येचा निषेध केला आहे. तसेच कुटुंबाप्रति शोक व्यक्त केला आहे. याशिवाय अशोक गेहलोत यांनी सरकारवर निशाणा साधत एनडीए सरकार काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT