Govt Scheme esakal
देश

Govt Scheme: फ्रि शिलाई मशीनमुळे महिलांना मिळणार आर्थिक स्वातंत्र्य ; कसे करायचे अप्लाय वाचा

शहरी आणि ग्रामीण भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात

सकाळ डिजिटल टीम

Scheme: महिलांना सक्षम होऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी सरकारने महिलांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्या महिलांना घर आणि व्यवसाय दोन्ही सांभाळावे लागते अशांसाठी फ्रि शिलाई मशीन योजना सुरू केली. प्रत्येक राज्यात ५० हजारांहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील महिला याचा लाभ घेऊ शकतात.

ज्या महिलांना मशीन मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल. पीएम शिलाई मशीन 2022 योजनेंतर्गत, प्रत्येक राज्यातील 50 हजारांहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप केले जाईल. या योजनेतून गरीब महिला मोफत शिलाई मशीनवर काम करून स्वत:चे व मुलांचे पालनपोषण करू शकतील. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहार या सर्व राज्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे.

गरीब महिलांच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी शासनाने शिलाई मशीन योजना तयार केली आहे, ही योजना महिलांना घराबाहेर न पडता आरामात घरात बसून पैसे कमविण्याची संधी मिळेल. देशातील सर्व महिलांना या योजनेचा फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

कोणाला मिळणार लाभ ?

देशातील गरीब महिला अर्ज करू शकतात. अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे वय 20 ते 40 वर्षे दरम्यान असावे. महिलेच्या पतीचे वार्षिक उत्पन्न 12 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. देशातील केवळ विधवा आणि अपंग महिला या योजनेत सहभागी होण्यास पात्र असतील.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर, वयाचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, महिला अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र, महिला विधवा असल्यास तिचे विधवा प्रमाणपत्र.

कसे करावे अप्लाय

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.

वेबसाइटवर फ्री शिलाई मशीन योजनेची लिंक दिसेल.

त्या लिंकवर क्लिक करताच तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

या पेजवर मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज असेल, ज्यामध्ये तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यक माहिती विचारली जाईल. तो अर्ज पूर्ण भरा.

अर्ज भरल्यानंतर, शेवटी तुम्हाला कोड टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT