RBI 
देश

सरकारी व्यवहार होणार खासगी बँकांतून

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - सरकारशी निगडित आर्थिक व्यवहार करण्यासाठी खासगी बॅंकांवर असलेले निर्बंध आज उठविण्यात आले. यामुळे नागरिकांनी त्यांचे निवृत्तिवेतन, अल्पबचत योजना व इतरही सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांसाठी केवळ सरकारी बॅंकांवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही व खासगी बॅंकांच्या माध्यमातूनही ते आता हे व्यवहार करू शकणार आहेत.

निर्बंध उठविल्याने आता खासगी बॅंकांना या संदर्भात रिझर्व्ह बॅंकेच्या परवानगीची आवश्‍यकता भासणार नाही. विना-परवानगी ते सरकारी वित्तीय व्यवहार करू शकतील. या निर्णयाची माहिती सरकारने रिझर्व्ह बॅंकेला कळविलेली आहे. आता सरकारी बॅंकांच्या बरोबरीने ते हे व्यवहार करू शकतील.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही निवडक खासगी बॅंका वगळता सरकारी वित्तीय किंवा आर्थिक व्यवहार करण्यासाठी नागरिकांना केवळ सरकारी बॅंकांचे माध्यमच उपलब्ध होते. आता हे निर्बंध उठविल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे. यामुळे स्पर्धेला वाव मिळेल व त्यामुळे नागरिकांना अधिक चांगली बॅंकिंग सेवा मिळणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर कार्यक्षमेततही वाढ होणे अपेक्षित आहे. 

बॅंकिंग व्यवहारांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान तसेच अन्य नावीन्यपूर्ण सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात खासगी बॅंका आघाडीवर असल्याचे गेल्या काही काळात दिसून आले आहे. नागरिकांना देखील त्याचा लाभ झाल्याचे आढळून आले आहे. या बाबी लक्षात घेता खासगी बॅंकांवरील हे निर्बंध उठविण्याचा निर्णय सरकारने केला. खासगी बॅंकांना समान भागीदारी देण्याने भारतीय अर्थव्यवस्थेतील सामाजिक क्षेत्राच्या व्यापक विकासाबरोबरच अर्थव्यवस्थेलाही त्याचा लाभ होणार आहे असा दावा सरकारतर्फे करण्यात येत आहे. 

सरकारी बँका टिकाव धरतील?
सरकारी बॅंकांच्या विलीनीकरण व एकत्रीकरणाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून वर्तमान सरकारने महाकाय अशा बॅंका तयार केल्या व आता त्यांच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याच प्रक्रियेत सरकारशी निगडित वित्तीय व्यवहारातही खासगी बॅंकांना प्रवेश देऊन नव्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला सरकारी बॅंका टिकाव धरु शकतील काय? अशी शंकाही यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! प्रत्येक लेव्हलचा फिटमेंट फॅक्टर असेल वेगळा; उद्या आयोगाची बैठक

PAK vs ENG, T20 WC: पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द झाला तर? मुंबईतील उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे नाही खेळवावा लागणार; जाणून घ्या गणित

Dombivli Crime: नर्सने बोलणे बंद केले, रागात डॉक्टरने १० बिअर पिऊन ४५ झोपेच्या गोळ्या खाल्ल्या; त्यानंतर जे घडलं...

"माझं माझ्या बायकोवर प्रेम नाही" प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा ; "जबरदस्तीने लग्न.."

Latest Marathi News Live Update : बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडापलं

SCROLL FOR NEXT