Grandma Esakal
देश

Video Viral: आज्जींने पहिल्यांदाच खाल्ला 'Pasta'; पाहा तिची Reaction

पास्ता खाल्ल्यानंतर तिने दिलेली प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही आज्जीचे कौतुक वाटेल.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर सध्या आज्जींचे हृदयस्पर्शी आणि मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ पाहून अनेकांना आपल्याही आज्जीचे (Grandma)असे व्हिडीओ करण्याचा मोह आवरणार नाही. इन्स्टाग्रामवर याचे खूप व्हिडिओ पाहायला मिळत आहेत . दोन दिवसापूर्वी काश्मीरच्या (Kashmir)इंग्रजी दादीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर आता पास्ता (Pasta)खाणाऱ्या आज्जींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जी पहिल्यांदा पास्ता खाल्ल्यानंतर तिने दिलेली प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही आज्जीचे कौतुक वाटेल. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम ब्लॉगर सोनाक्षीने पोस्ट केला आहे.

पास्ता खाल्ल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही आज्जीचे कौतुक वाटेल.

व्हिडीओच्या सुरुवातीला ९० वर्षाची आज्जी बेडवर हातात पास्ताची प्लेट धरून बसलेली दिसत आहे. काही वेळाने ती पास्ता खायला लागते. पास्ता खात असतानाच तो तिला किती आवाडला, पास्ता कसा झाला आहे हे इंग्रजीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. हा पास्ता तिने पहिल्यांदाच टेस्ट केला आहे. खाताना ती म्हणते व्वा. तिच्या शेजारी बसलेल्या मुलीने नानी आवडला का विचारताच नानी म्हणते खूपच छान, ब्यूटीफुल...ब्यूटीफुल.

ब्लॉगर सोनाक्षीने व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले की, आज्जी ९० वर्षाची आहे, मात्र तिच्यातील उत्साह तरूणींना लाजवेल. कांद्याशिवाय, लसणाशिवाय घरी बनवलेला क्रिमी पालक पास्ता खाताना तिला किती आवडतो हे इंग्रजीत सांगण्याचा प्रयत्न करते. या वयातही तिची नाविन्य शिकण्याची जिद्द आहे. सुंदर, स्वादिष्ट, ठीक नाही, तू वाईट आहेस, शट अप असे नविन शब्द शिकण्याचा ति प्रयत्न करत आहे. अशा आज्जीसोबत वेळ घालवणे म्हणजे जगातील सर्वांत सुंदर अशी गोष्ट असल्याचे ते म्हणते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: रविवारी सुट्टीची गरज का आहे? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी तरुण वकिलांना काय दिला सल्ला?

Devendra Fadnavis:‘बारामती’ बिनविरोध होण्यास‘प्रसिद्धी’मुळे खोडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रमुख पक्षांच्या प्रयत्नांनाही धक्का!

Kolkata Knight Riders: अजिंक्य रहाणेला दिलासा! १८ कोटींचा स्टार अखेर मैदानात; KKR चं टेंशनचं मिटल

Shevgaon Murder: तरुणाचा दगडाने ठेचून खून; शेवगावमधील घटना, ओढ्याजवळ अढळला मृतदेह, तीन संशयित ताब्यात, काय घडलं!

Mumbai Local Train : थरकाप उडवणारी घटना! विक्रोळी स्थानकावर लोकलचा थांबा चुकला, काही क्षणातच मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT