wedding
wedding 
देश

ठरलेलं लग्न मोडलं, भांडणाचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोर्टाची पायरी चढू नये असा थोरामोठ्यांचा सल्ला आता राजकारणात पडू नये असाही ऐकायला मिळाला तर नवल नको वाटायला. हल्ली राजकारणावर किंवा एखाद्या विषयावर सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्यांमध्ये वादही होतात. आता अशाच एका राजकीय चर्चेमुळे ठरलेलं लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील एका उद्योगपतीचं सरकारी कर्मचारी असलेल्या मुलीसोबत ठरलं होतं. मात्र त्यांच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत असलेल्या मतभेदांमुळे दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील एका उद्योगपतीचं लग्न सरकारी कर्मचारी असलेल्या मुलीशी ठरलं होतं. संबंधित जोडप्याचं नाव प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही. दोन्हीकडचे लोक एका मंदिरात लग्नाच्या बोलणीसाठी भेटणार होते. स्थळ पाहण्यापासून ते अगदी लग्न ठरवण्यापर्यंत सर्व काही सुरळीत पार पडलं होतं. दरम्यान, दोघांपैकी कोणीतरी अर्थव्यवस्थेच्या मंदीचा विषय काढला. महिलेनं लग्न मोडण्यासाठी थेटं मोदीच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

उद्योगपती असलेल्या मुलाने मोदींची बाजू मांडली होती. दोघांमध्ये त्या मुद्द्यावरून वाद झाला आणि त्यांनी शेवटी लग्न न करण्याचं ठरवलं. दुसरीकडे दोघांमधील या वादानंतर आणि घेतलेल्या निर्णयानंतर दोन्ही घरच्या लोकांना धक्काच बसला. दोघांनीही घरच्यांना आम्ही लग्न करणार नाही असं सांगून टाकलं. 

सोशल मीडियावर ही या न झालेल्या लग्नाची चर्चा जोरात होत आहे. मोदींमुळे आता लग्नही होईनात अशा काही कमेंट कऱण्यात येत आहेत. तर काहींनी लग्न मोडण्यासाठी दोघांनी जे कारण सांगितलं ते हास्यास्पद असल्याचंही म्हटलं आहे. शिकलेल्या लोकांकडून अशा कारणांनी लग्न रद्द करण्याचा प्रकार न पटणारा आहे असं काहींनी म्हटलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: अटारी ड्रग्ज प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT