GST Council Meeting esakal
देश

GST Council Meeting: वाढता टॅक्स लावणार खिशाला कात्री, हॉटेलमध्ये राहणे, पनीर खाणे आता महागणार

धनश्री ओतारी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक (GST Council Meeting)आज चंदीगडमध्ये सुरू राहणार आहे. एक दिवस आधी मंगळवारी जीएसटी बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पहिल्या दिवशी झालेल्या बैठकीत अनेक गोष्टी जीएसटीच्या कक्षेत आणण्यात आल्या आहेत.

पॅक दही, पनीर, मध, पापड, लस्सी, ताक आता महाग होणार आहे. दुसरीकडे, 1000 रुपयांपेक्षा कमी दर असलेल्या हॉटेल रूमवर 12 टक्के जीएसटी आकारण्याची चर्चा आहे. त्याच वेळी, चेक जारी करण्यासाठी बँकांकडून आकारल्या जाणार्‍या शुल्कावर 18 टक्के जीएसटी देखील लावला जाईल. सोलर वॉटर हिटरवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची चर्चा आहे.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली, 28 जून 2022 रोजी जीएसटी काऊंसिलची (GST Council) बैठक सुरु झाली आहे. चंदीगढ (Chandigarh) येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीला सर्व राज्याचे अर्थमंत्री हजर आहेत. 1 जुलै 2022 रोजी जीएसटी लागू करण्यास 5 वर्षे पूर्ण होतील. या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर जीएसटी परिषदेची ही बैठक होत आहे.

ऐनवेळी श्रीनगर येथे होणारी बैठक रद्द करत, ती चंदिगढ येथे ठेवण्यात आली. या बैठकीत काही वस्तूंच्या कर रचनेत(GST Slab) बदल होऊ शकतो. तसेच ई-कॉमर्स पुरवठादारांच्या नोंदणी नियमांमध्ये बदल होऊ शकतो. ही बैठक 28 आणि 29 जून रोजी होत आहे. दर सहा महिन्यांनी परिषदेची बैठक होते.

पहिल्या दिवसाच्या बैठकीनंतर घेतलेल्या निर्णयानुसार, दही, चीज, मध, मांस आणि मासे यासारख्या कॅन केलेला आणि लेबल किंवा ब्रँडेड वस्तू महाग होणार आहेत. दुसरीकडे हॉटेलमध्ये राहणेही महागणार आहे. निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली चंदीगड येथे जीएसटी परिषदेची 47 वी बैठक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT