Gujarat Election Congress Party esakal
देश

Gujarat Election : भाजपनंतर काँग्रेसनं 46 उमेदवारांची यादी केली जाहीर; आतापर्यंत 89 नावांची घोषणा

दोन दशकांपासून सत्तेबाहेर असलेला काँग्रेस पक्ष निवडणुकीत विजयासाठी घाम गाळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

दोन दशकांपासून सत्तेबाहेर असलेला काँग्रेस पक्ष निवडणुकीत विजयासाठी घाम गाळत आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये निवडणूक (Himachal Pradesh Election) प्रचार थांबल्यानं राजकीय वारं गुजरातच्या दिशेनं वाहू लागलंय. काँग्रेस पक्षानं (Congress Party) गुजरात निवडणुकीसाठी (Gujarat Election) 46 उमेदवारांची नावं असलेली दुसरी यादीही प्रसिद्ध केलीय.

यापूर्वी पक्षानं 43 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. आतापर्यंत एकूण 89 जणांना विधानसभेचं तिकिटं देण्यात आलं आहे. दुसरीकडं आम आदमी पक्ष आणि भाजपनंही (BJP) बहुतांश उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत जुनागढमधून भिखाभाई जोशी, सुरत पूर्वमधून अस्लम सायकलवाला, सूरत उत्तरमधून अशोक भाई पटेल, वलसाडमधून कमल कुमार पटेल आणि भुजमधून अर्जन भाई भुडिया यांच्या नावांचा समावेश आहे.

गुजरातमध्ये दोन दशकांपासून सत्तेबाहेर असलेला काँग्रेस पक्ष निवडणुकीत विजयासाठी घाम गाळत आहे. मात्र, नव्यानं सुरू झालेला आम आदमी पक्षही या निवडणुकीत उतरल्यानं रंगत वाढलीय. दरम्यान, सत्ताधारी भाजपनंही विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. या यादीत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेला पाटीदार नेता हार्दिक पटेल आणि क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांच्या नावांचाही समावेश आहे. भाजपनं पाच विद्यमान मंत्र्यांसह सुमारे तीन डझन आमदारांची तिकिटं कापली आहेत.

भाजपनं आपल्या पहिल्या यादीतच 160 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. दुसरीकडं विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांना घाटलोडियातून तिकीट देण्यात आलं आहे. या जागेवरून भूपेंद्र पटेल अजूनही आमदार आहेत. गुजरातमधील एकूण 182 जागांसाठी 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. हिमाचल आणि गुजरात निवडणुकांचे निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT