Hardik Patel esakal
देश

हार्दिक पटेल काँग्रेसचा 'हात' सोडणार? हायकमांडला देणार मोठा धक्का!

सकाळ डिजिटल टीम

'भाजप मजबूत आहे. कारण, त्यांच्याकडं नेतृत्व आहे आणि ते वेळीच योग्य निर्णय घेतात.'

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी (Gujarat Assembly Election) काँग्रेसला (Congress) मोठा झटका बसताना दिसत आहे. पाटीदार आंदोलनातून राजकारणात आलेले गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी प्रदेश काँग्रेस नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केलेत. यावरुन हार्दिक पटेल यांची बंडखोर वृत्ती दिसून येत आहे. हार्दिक यांनी स्वत:ला राम भक्त म्हणवून घेतलंय. आम्हाला हिंदू असल्याचा अभिमान आहे, पण भाजपमध्ये (BJP) प्रवेशबाबत त्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाहीय.

हार्दिक पटेल यांनी राज्य नेतृत्वाबाबत आपली बाजू काँग्रेस हायकमांडसमोर (Congress High Command) मांडलीय. दिल्लीत त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाशी माझी कोणतीही अडचण नाहीय, असं त्यांनी स्पष्ट केलं. गुजरातमधील जनतेचा विरोधी म्हणून आवाज उठवता येत नाहीय, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

गुजरात काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं हार्दिक पटेल यांना जाहीरपणे बोलू नका आणि अंतर्गत प्रकरणावर वैयक्तिक चर्चा करू नका, असा इशाराही दिलाय. यानंतर हार्दिक पटेल राज्य नेतृत्वाबाबत सातत्यानं वक्तव्ये करत आहेत. अशा स्थितीत गुजरात काँग्रेसमध्ये (Gujarat Congress) सर्व काही ठीक नाहीय, असं दिसतंय. जनतेच्या प्रश्नांवर विरोधकांना सरकारच्या विरोधात लढा आणि संघर्ष करावा लागेल, असं हार्दिक पटेल म्हणाले. आपण तसे करू शकलो नाही तर लोक इतर पर्याय शोधतील. गुजरातमध्ये भाजप मजबूत आहे. कारण, त्यांच्याकडं नेतृत्व आहे आणि ते वेळीच योग्य निर्णय घेतात. मात्र, माझा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही विचार नसल्याचं हार्दिक पटेल यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात दोन ठार; सिंदेवाही, सावली तालुक्यांतील घटना, नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण

ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १६ जणांचा मृत्यू; हल्लेखोर बापलेक पाकिस्तानचे

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता!

Nagpur Crime: वाटणीवरून थोरल्‍याने केला धाकट्याचा खून; मोहगाव सावंगी, नाल्यात जळालेल्या अवस्थेत शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

Panchang 15 December 2025: आजच्या दिवशी विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे आणि ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT