देश

Gujarat MC Election Result : भाजपचा मोठा विजय; मोदी, शहांनी मानले गुजरातच्या जनतेचे आभार

सकाळ डिजिटल टीम

गांधीनगर- गुजरातमधील स्थानिक महापालिका निवडणुकीचे मंगळवारी निकाल जाहीर झाले. राज्यातील अहमदाबाद, सूरत, वडोदरा, जामनगर, भावनगर आणि राजकोट  या सहाही महापालिकांमध्ये भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत.

आम आदमी पार्टीने सूरतमध्ये आठ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला या ठिकाणी एकाही जागा अद्याप मिळू शकलेली नाही. जामनगरमध्ये बसपाने तीन जागांवर तर पहिल्यांदाच गुजरातमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने अहमदाबादमध्ये चार जागांवर विजय मिळवला आहे.
 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार

गुजरातच्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत. मोदींनी ट्विट करुन म्हटलं, "गुजरातचे धन्यवाद! राज्यातील महापालिका निवडणुकीचे निकाल स्पष्ट संदेश देतात की लोकांमध्ये विश्वास आणि सुशासनाच्या राजकारणाप्रती मोठा विश्वास आहे. भाजपवर पुन्हा भरवसा दाखवल्याबद्दल मी राज्याच्या जनतेचा आभारी आहे. गुजरातची सेवा करणं आमचा सन्मान आहे."

आजवरचा सर्वात चांगला निकाल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुजरातमधील महापालिका निवडणुकीच्या निकालावर बोलताना म्हणाले, "या निवडणुकीत काँग्रेसचा सपशेल पराभव झाला आहे. संपूर्ण गुजरातमध्ये काँग्रेसला केवळ ४४ जागा मिळल्या आहेत. गुजरातमधील महापालिका निवडणुकीचा हा निकाल हे दर्शवतो की, भाजपाने पुन्हा एकदा आपला गड राखला आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जी विकासयात्रा सुरु झाली होती ती भाजपाने आजही कायम राखली आहे. आज जो निकाल आल आहे तो आजवरचा सर्वात चांगला निकाल आहे."
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: सत्तेचा काटा फिरवणार! काँग्रेस–वंचितची आघाडी कुणाचं गणित बिघडवणार? मुंबईची राजकीय सत्तासमीकरणं हादरली

Daulatabad News : वेरूळ, देवगिरी परिसर ‘हाउसफुल्ल’; घाटात वाहनांच्या रांगा; सलग सुट्यांचा परिणाम

Vastu Shastra: आठवड्याच्या 'या' दिवसांत पैशाचे व्यवहार करू नका, वास्तुशास्त्रात सांगितले महत्त्वाचे नियम

Horoscope : 2026 वर्ष सुरू होताच बनतोय लक्ष्मी-कुबेर धनलाभ योग; 6 राशींच्या लोकांना मिळणार भरपूर पैसा, अडकलेली कामे होणार पूर्ण

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंना पश्चाताप होईल, असे जागावाटप, उदय सामंतांची टीका

SCROLL FOR NEXT