amit shah 
देश

Gujarat Municipal Election result: भाजपचा दणदणीत विजय, काँग्रेसची दैना, AAP-AIMIM ची एन्ट्री

सकाळन्यूजनेटवर्क

गुजरात- गुजरात स्थानिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा विजय प्राप्त झाला आहे. गुजरातमधील सत्ताधारी भाजपने सर्व 31 जिल्ह्यातील पंचायतीसह 231 तालुका पंचायतीपैकी 196 आणि 81 नगरपालिकांपैकी 74 मध्ये स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.  त्यामुळे भाजपचा दणदणीत विजय झाल्याचं दिसतंय. राज्यातील मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने फक्त एक नगरपालिका आणि 18 तालुका पंचायतींमध्ये स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. दुसरीकडे आप आणि एमआयएमआयएमने आपली उपस्थिती दाखवून दिली आहे. याआधी मागील महिन्यात झालेल्या पहिल्या टप्प्यातील स्थानिक निवडणुकीत, भाजपने सर्व सहा महापालिकांमध्ये विजय प्राप्त केला होता. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत भाजपने 8,470 जागांपैकी 6,236 जागांवर विजय प्राप्त करत काँग्रेसला खूप मागे टाकलं आहे. काँग्रेसला केवळ 1,805 जागा जिंकता आल्या. एमआयएमआयएमला 17 जागा, तर आप पक्षाला 42 जागा जिंकता आल्या. मात्र, चार जागांवरील निकाल असून स्पष्ट झाले नाहीत. 

असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमने अरावली जिल्ह्यातील मोडासा नगरपालिकेत 9 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय भरुचमध्ये एक जागा आणि सात जागा पंचमहालच्या गोधरामध्ये जिंकल्या. आम आदमी पक्षाने 31 जागा तालुका पंचायत, दोन जागा जिल्हा पंचायत आणि 9 जागा नगरपालिकेमध्ये जिंकल्या आहेत. 

राज्य निवडणूक आयोगाने सांगितल्यानुसार  8,474 जागांपैकी 237 जागेवर उमेदवार बिनविरोध राहिले. नगरपालिका निवडणुकीत मतदान 59.05, जिल्हा पंतायतसाठी 66.67 टक्के आणि तालुका पंतायतसाठी 66.86 टक्के झाले. तालुका पंतायतच्या दोन जागा आणि नगरपालिकेच्या 24 जागांवर पोटनिवडणुकाही झाल्या. विशेष म्हणजे भाजपला 2015 च्या स्थानिक निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त जागा मिळाल्या आहेत. 

निकालावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "गुजरातमध्ये झालेल्या नगरपालिका, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांचे निकालाने स्पष्टपणे संदेश दिला की, भाजपच्या विकास आणि सुशासनाच्या कामगिरीवर गुजरातच्या जनतेने आमची साथ दिली. या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी मी गुजरातसमोर आपली मान झुकवतो." भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी जनतेचे आभार मानले आहेत. भाजपावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल गुजरातच्या जनतेला धन्यवाद देतो. हे स्थानिक पंचायत निवडणुकांचे निकाल विकास आणि विश्वासाचे प्रतिक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT