देश

Video : गुजरात दंगलीतील ‘हिंदू ऑयकॉन’ सध्या काय करतोय?

सकाळ वृत्तसेवा : संतोष शाळिग्राम

अहमदाबाद : गुजरात दंगलीमध्ये अशोक परमार (मोची) आणि कुतुबुद्दीन अन्सारी हे दोन चेहरे सर्वाधिक चर्चेत होते. डोक्यावर भगवी पट्टी बांधलेला आणि हातात तलवार घेतलेला अशोक परमार हिंदू दहशतवादी म्हणून सर्व वर्तमानपत्रामध्ये छापून आला होता. इंटरनेटवर आजही त्याचे दंगलीतील फोटो पहायला मिळतात. तर दुसरीकडे कुतुबुद्दीन अन्सारी याचा दंगलखोरांपुढे दया याचना करणारा फोटोही सर्वत्र प्रसिद्ध झाला होता. आज, अशोकर परमारचं आयुष्य खूप वेगळं आहे. अहमदाबादमध्ये तो एका चप्पल दुकान चालवतो आहे. त्याच्याशी सकाळने संवाद साधला.

'माझ्या फोटोंचा गैरवापर'
गुजरात दंगलीवेळी माझ्या छायाचित्रांचा गैरअर्थ काढून गैरवापर करण्यात आला आहे. गेली सतरा वर्षे त्याचा त्रास झाला. कोर्टबाजी झाली, केस चालली. पण एकाही मुस्लिमाने विरोधात साक्ष दिली नाही. मी निर्दोष होतो. सर्व संकटे सरली. आता चप्पलचे दुकान थाटले आहे. गुजरात दंगलीमध्ये आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा बनलेल्या अशोक परमार (मोची) याने सकाळशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

असा बनला अशोक ‘हिंदू ऑयकॉन’
अशोक म्हणाला, ‘माध्यमातून माझ्या छायाचित्राचा गैरवापर झाल्याने मला कट्टर हिंदुत्ववादी ठरविण्यात आले होते. पण, वस्तुस्थिती वेगळी आहे. फेब्रुवारी 2002 दंगल सुरू झाली. त्यावेळी मी दिल्ली दरवाजा भागात चप्पल दुरुस्तीचे काम करीत होतो. मला आई-वडील नसल्याने मी बाहेरच राहात असे. दंगल सुरू झाली. लोक दुकानांना आग लावत होते. दुकाने बंद होत होती. सकाळी चहादेखील प्यायला मिळाला नव्हता. त्यामुळे राग मनात होता. त्यात काही हिंदूंनी मला मुस्लिम समजून मारण्याचा प्रयत्न केला. मी हिंदू असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी मला सोडले. पुढे आणखी त्रास होऊ नये म्हणून एक भगवा कपडा डोक्याला बांधला आणि हातात लोखंडाची सळी घेतली. त्यावेळी काही पत्रकारांची नजर माझ्यावर पडली आणि माझी ओळख हिंदू ऑयकॉन बनली.’

शहराची ओळख बदलली
अशोक म्हणाला, ‘माझा कोणत्याही हिंदू संघटनेशी संबंध नव्हता. रस्त्यावर बसून मोचीकाम करणे आणि पोटापुरते कमावणे एवढेच ध्येय होते. पण, मुस्लिमविरोधी प्रतिमा बनविण्यात आली. याला आता 17 वर्षे झाली आहेत. मला वाटते हिंदू-मुस्लिम असा भेद नसावा, याचा फायदा दोन्ही धर्माचे कट्टरवादी उचलतात. सामान्य लोकांना त्याचा काहीच फायदा होत नाही. झाला, तर त्रासच होतो. पूर्वी अहमदाबाद शहराची प्रतीमा दंगलखोर शहर अशी होती. पण, आता शहर गुण्यागोविंदाने नांदत आहे. शहराची ओळख बदलली आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

SCROLL FOR NEXT