jammu kashmir election,gupkar alliance, bjp, ddc election 
देश

J&K DDC Poll Results: जम्मू-काश्मीर निवडणुकीत भाजप मोठा पक्ष, 'गुपकार' आघाडी शंभरी पार  

सकाळ ऑनलाईन टीम

J&K DDC Poll Results: जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत फारुक अब्दुल्लांसह सात पक्षांच्या आघाडीने (पीपल अलायन्स फॉर गुपकार डिक्लरेशन) 280 पैकी 112 + जागेवर यश मिळवले आहे. भाजप 74+ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. जिल्हा विकास परिषदेची निवडणूक आठ टप्प्यांमध्ये झाली होती. गुपकार आघाडी आणि काँग्रेसला 20 पैकी 13 जिल्ह्यात यश मिळण्याची संकेत दिसत आहेत.    
केंद्र शासित प्रदेश निवडणुक आयोगाच्या दिलेल्या माहितीनुसार, 'पीपल अलायन्स फॉर गुपकार डिक्लरेशन' या आघाडीने 100 जागेवर विजय मिळवला असून 12 जागेवर ते आघाडीवर आहेत. 49 अपक्षांना यश मिळाले असून 6 जागेवर अपक्ष उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.  

काँग्रेसच्या वाट्याला 26 जागा

जम्मू अँण्ड काश्मीर अपनी पार्टीला (जेकेएपी) 12 जागेवर यश मिळाले आहे. त्यांच्या खात्यात आणखी एक जागा वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या वाट्याला आतापर्यंत 26 जागा आल्या आहेत. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा निर्णय झाल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. 280 मध्ये 140 जागा या जम्मूतील तर 140 जागा या काश्मीरमधील आहेत. 

जम्मूमध्ये भाजपचा दबदबा
डीडीसी निवडणुकीत जम्मूमध्ये भाजपचा बोलबाला दिसून येत आहे.  नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी यासारख्या स्थानिक पक्षाच्या गुपकार आघाडीला काश्मीर खोरे आणि पंजाल आणि चेनाब खोऱ्यात अधिक दबदबा दिसून यतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईत १ तारखेपासून नवीन वाहतूक नियम; दक्षिण भागात अधिक कठोर नियम, 'या' वाहनांना प्रवेश नाही

Budget 2026: बजेट तयार करण्यासाठी किती वेळ लागतो? ‘ब्लू शीट’ म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या पडद्यामागची प्रक्रिया...

Pune News : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी सोपान उर्फ काका चव्हाण यांची निवड

Supreme Court Order: सॅनिटरी पॅड नसेल तर शाळा नाही! सर्वोच्च न्यायालयाचा कडक आदेश

बीडच्या गुरुजींनी निभावली अजित पवारांवरील अंत्यसंस्काराची जबाबदारी; आठ वर्षांपासून पवार कुटुंबियांकडे पौरोहित्य

SCROLL FOR NEXT