देश

साखर सम्राटांना मते; आता आंदोलन का? - कुमारस्वामी

सकाळवृत्तसेवा

बंगळूर - साखर कारखान्यांच्या मालकांना मते देऊन आमदार, खासदार व मंत्री बनविता. आता कुमारस्वामी सरकार उसाची बाकी देत नसल्याची तक्रार करता. हे योग्य नाही, असे सांगून मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली. बंगळूर कृषी विद्यापीठात कृषी मेळाव्याच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

ते म्हणाले, शेतकरी शांतताप्रिय आहेत. ऊस उत्पादक असल्याचे सांगून काही विध्वंसक शक्‍ती गोंधळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. दगडाने सुवर्णसौधच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडणारे खरे शेतकरी नाहीत. शेतकऱ्यांचे नाव बदनाम करीत आहेत. माझ्या संयमालाही मर्यादा आहे. चार वर्षापासून पैसे न दिलेल्या साखर कारखान्यांच्या मालकांना मते देऊन शेतकऱ्यांनीच त्यांना आमदार व मंत्री बनविले आहे. सहा महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या कुमारस्वामी यांनी पैसे दिले नसल्याचा आरोप करुन सुवर्णसौधचा कुलूप तोडता? हे योग्य आहे का, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्‍त केला.

मी शेतकऱ्यांवर कारवाई करणार नाही. परंतु, शेतकऱ्यांच्या नावाने कायदा हातात घेणाऱ्यांना सोडणार नाही. ऊस उत्पादकांना ट्रकखाली झोपवून सरकारविरुध्द आंदोलन असल्याचे भासविण्यात येत आहे. अशा गोष्टींना आम्ही घाबरणार नाही

- एच. डी. कुमारस्वामी, मुख्यमंत्री

मी लोकांचे प्रेम संपादन करण्याचा प्रयत्न करीत आहे. विधानसौधच्या तिसऱ्या मजल्यावर बसून काम करणारा मी मुख्यमंत्री नाही. शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करण्यास सरकार कटिबध्द आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कर्जाची परतफेड
राज्यात काही जिल्ह्यात दुष्काळ आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पावसाअभावी काही भागातील पिके जळून गेली आहेत. काही भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे, सरकारने ४५ हजार कोटीचे पीक कर्ज माफ केले आहे. हा बोजा राज्य सरकार सहन करणार आहे. येत्या जूनपूर्वी तुमच्या कर्जाची परतफेड होणार आहे. आत्महत्येला सामोरे न जाता विशेष करून तरुण शेतकऱ्यांनी धैर्याने वागा, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT