HAM leader Santosh Kumar Suman after resigning as a Bihar minister  
देश

Bihar Politics : पक्षासाठी मंत्रीपद लाथाडलं! बिहारमध्ये नितीश कुमारांना मोठा झटका

रोहित कणसे

लोकसभा निवडणूक २०२४ च्या आगोदर विरोधीपक्षांच्या एकजुटीसाठी २३ जून रोजी पटणा येथे बैठक होणार आहे. मात्र या बैठकीपूर्वीच नितीश कुमार सरकारला जोरदार धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचे पुत्र आणि हिंदुस्तानी आवामी मोर्चा (Hindustani Awam Morcha) चे एकमेव मंत्री संतोष मांझी यांनी राजीनामा दिला आहे.

नितीश कुमार यांच्या पक्षासोबत युतीत अनुसूचित जाती-जमाती कल्याणमंत्री राहिलेल्या सुमन यांनी राजीनाम्यापूर्वी अर्थमंत्र्यांशी दीर्घ चर्चा देखील केली. दरम्यान संतोष सुमन ऊर्फ संतोष मांझी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य किंवा माहिती देण्यात आलेली नाही. राजीनामा स्वीकारल्यास तो राज्यपालांकडे पाठवला जाईल.

मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर संतोष सुमन म्हणाले की, आम्हाला विरोधी एकजुटीसाठी कोणताही फोन आलेला नाही, कारण जेडीयूला आमच्या संपूर्ण पक्षाचे विलीनीकरण हवे होते. पक्ष म्हणून आमच्या अस्मितेवर प्रश्नचिन्ह होते, त्यामुळे 'हम'चे (HAM) कुटुंब फोडण्याएवजी सरकार सोडणे हाच शेवटचा पर्याय होता. आम्ही पक्षासाठी मेहनत घेत आहोत, त्यामुळे असा पर्याय निवडणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी एकता बैठकीचे निमंत्रण नाही

संतोष कुमार सुमन यांनी नाराजी व्यक्त करत २३ जून रोजी पटणा येथे होणाऱ्या विरोधक एकजुटीसाठी होत असलेल्या बैठकीपासून आम्हाला दूर ठेवण्यात आले असल्याचे म्हटले आहे . सोमवारी माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी विरोधी ऐक्याच्या नावाखाली पाटणा येथे होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याचे उघडपणे मान्य केले होते. काही दिवसांपूर्वीपर्यंत मांझी सातत्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पाठिंबा सोडणार नसल्याचे सांगत होते, मात्र संतोष मांझी यांच्या या निर्णयानंतर जीतन राम आपला शब्द पाळू शकले नाहीत हे उघड झाले आहे.

माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी म्हणाले की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आमचा पक्ष एका जागेवर लढणार नाही. प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारले की, तू चेष्टा करताय का? उत्तर देताना मांझी म्हणाले की, तुम्हाला जे समजायचे आहे ते समजून घ्या, पण आमचा पक्ष एका जागेवर लोकसभा निवडणूक लढवणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar NDA Latest Update : बिहारमध्ये निवडणुकीआधीच ‘NDA’त खेला! नितीश कुमारांनी चिराग पासवान यांच्या जागांवर दिले उमेदवार

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

SCROLL FOR NEXT