Gallows 
देश

तिहारमध्ये फाशीची रंगीत तालीम

पीटीआय

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना २२ जानेवारीला सकाळी सात वाजता फाशी देण्यात येणार आहे. याची रंगीत तालीम तिहार कारागृहात रविवारी (ता. १२) घेण्यात आली, अशी माहिती कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिली. ती यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले.

रंगीत तालमीसाठी अधिकाऱ्यांनी दोषींचे वजन घेऊन त्यानुसार बनावट प्रतिकृती तयार केली. त्यासाठी दगड आणि अवशेषाने भरलेल्या पोत्यांचा वापर करण्यात आला. कारागृह क्र. ३ मध्ये फाशीची रंगीत तालीम अधिकाऱ्यांच्या पथकाने घेतली. फाशीसाठी वापरण्यात येणारे दोर एवढे वजन पेलवू शकतात का, चौघांना फाशी देण्यासाठी किती वेळ लागतो आणि फाशीच्या चारही ठिकाणी काही तांत्रिक त्रुटी राहिली नाही व याची खात्री करून घेण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाल्याचे समाधान तुरुंगाचे अधिकऱ्यांना वाटत आहे. वेळेचे नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्यासाठी फाशी देण्यासाठी लागणारा वेळ थोडा कमी करण्यात येण्याची शक्‍यता आहे.

चारही दोषींना फाशी देण्यासाठी मेरठहून पवन जल्लादची रवानगी तिहारला करण्यात आले असल्याच्या वृत्ताला उत्तर प्रदेश कारागृह प्रशासनाने दुजोरा दिला आहे. ‘निर्भया’प्रकरणात मुकेश (वय ३२), पवन गुप्ता (वय २५), विनय शर्मा (वय २६) आणि अक्षय कुमारसिंह (वय ३१) यांना फासावर चढविण्यासाठी दोन जल्लादांची गरज असल्याचे तिहार प्रशासनाने उत्तर प्रदेश तुरुंग प्रशासनाला लेखी कळविले आहे. चारही आरोपींना एकाच वेळी फाशी देण्याची शक्‍यता आहे. त्यांची मानसिक स्थिती चांगली आहे का, हे पाहण्यासाठी तुरंग अधिकारी चौघांशी दररोज संवाद साधतात. 

फाशीपासून संरक्षण मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दुरुस्ती याचिका दाखल करणे, हा एकच कायदेशीर उपाय दोषींकडे उरला आहे. तसेच घटनात्मक उपायाचा वापर करीत राष्ट्रपतींकडे दया याचिकाही ते दाखल करू शकतात. सर्वोच्च न्यायालयात दुरुस्ती याचिका दाखल करणार असून, त्याचा निकाल लागेपर्यंत मृत्युदंडाच्या शिक्षेला स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दोषींच्या वकिलांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT