Happy Birthday Mayawati  esakal
देश

Mayawati : UP सारख्या राज्यात 'दलित मुख्यमंत्री' होणं सोप नव्हतं, पण ते 'बहेनजी'नं करुन दाखवलं!

मायावतींनी राजकारणाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केलाय.

बाळकृष्ण मधाळे

Happy Birthday Mayawati : आज उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा वाढदिवस आहे. मायावती यांचा जन्म 15 जानेवारी 1956 रोजी दिल्लीत झाला. मायावतींचे वडील प्रभू राम पोस्ट ऑफिसमध्ये काम करायचे. मायावतींनी राजकारणाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केलाय.

मायावती या देशाच्या पहिल्या महिला दलित मुख्यमंत्री आहेत. सर्वात तरुण मुख्यमंत्री बनणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला आहेत. मायावती उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री झाल्या आहेत. मायावती दशकाहून अधिक काळ सत्तेबाहेर असल्या, तरी त्यांचं कार्य लोक विसरलेले नाहीत.

मायावतींवर होता काशीराम यांचा प्रभाव

मायावतींनी राजकारणात येण्यापूर्वी शिक्षिका म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पण, त्या कांशीराम यांच्या विचारांनी खूप प्रभावित झाल्या आणि काशीराम यांचा तिच्या जीवनावर खूप प्रभाव पडला. काशीराम यांच्या तत्त्वांनी आणि कार्यानं प्रेरित होऊन मायावतींनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मायावती काशीराम यांच्या कार्यानं प्रभावित झाल्या, पण नंतर त्या स्वत: राजकारणात आल्या. 2003 मध्ये निवडणूक हरल्यानंतरही 2007 मध्ये त्या पुन्हा एकदा परतल्या आणि पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्री बनल्या.

शाळा सोडून राजकारणात केला प्रवेश

मायावतींचा राजकीय प्रवास खूप चांगला राहिला आहे. मायावती 1984 पर्यंत शिकवण्याच्या कामात व्यस्त होत्या, त्यानंतर काशीराम यांनी त्यांना बहुजन समाज पक्षात आणलं. 1984 मध्ये काशीराम यांच्या प्रभावाखाली मायावतींनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणात येण्यापूर्वी मायावती दिल्लीतील एका शाळेत शिकवत होत्या आणि IAS ची तयारी करत होत्या. पण, शिकवणीची नोकरी सोडून मायावतींनी पूर्णवेळ राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. मायावती यांनी मुझफ्फरनगर जिल्ह्यातील कैराना लोकसभा जागेवर सक्रियपणे काम केलं. 1985, 1987 आणि 1989 मध्ये त्यांनी या जागेवर मेहनत घेतली आणि 1989 मध्ये पक्षाला 13 जागा मिळाल्या. त्यानंतर 1995 मध्ये आघाडी सरकारमध्ये त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. 1989 मध्ये त्या पहिल्यांदा खासदार झाल्या.

मायावती बनल्या काशीराम यांच्या उत्तराधिकारी

2001 मध्ये काशीराम यांनी मायावतींना आपला उत्तराधिकारी बनवलं. 2002 ते 2003 दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं त्या पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. मात्र, काही काळानंतर मायावतींनी ही युती तोडल्यामुळं भाजपनं पाठिंबा काढून घेतला आणि मुलायमसिंह यादव राज्याचे मुख्यमंत्री झाले. मायावतींना त्यांचे समर्थक 'बहेनजी' म्हणतात. पण, त्या हुकूमशाही पद्धतीनं पक्ष चालवतात, असं त्यांच्या टीकाकारांचं म्हणणं आहे. मायावतींचे राज्यभरात अनेक पुतळे झाले. दलित महापुरुषांच्या आणि गौतम बुद्धांच्या अनेक मूर्ती त्यांनी बनवल्या.

देशातील सर्वोच्च दलित नेत्या

मायावती ह्या दलितांच्या मोठ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी ज्या प्रकारे दलितांना नैतिक बळ दिलं आणि स्वतःला देशातील दलितांसाठी आदर्श म्हणून सादर केलं, त्यांनी या समाजाला खूप बळ देण्याचं काम केलं. मायावतींचा दलित समाजात चांगला पगडा आहे, अलीकडच्या काळात त्यांचं राजकारण निश्चितच कमकुवत झालं असलं, तरी मायावती आजही देशातील आघाडीच्या दिग्गज दलित नेत्यांपैकी एक आहेत हे नाकारता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT