NIA 
देश

Hardeep Singh Nijjar: कॅनडात ठार झालेला खलिस्तानी निज्जर याचं पंजाबमधील घर जप्त होणार; NIA कोर्टाचे आदेश

दहशतवादी कारवायात गुंतलेल्या आणि कॅनडाचं नागरिकत्व घेतलेल्या निज्जरच्या हत्येवरुन सध्या कॅनडा आणि भारतातील संबंध तणावाचे बनले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कॅनडात ठार झालेला खलिस्तानी नेता हरदीप सिंह निज्जर याच्या आता पंजाबमधील घराची जप्ती करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास पथकाच्या (NIA) कोर्टानं दिले आहेत. त्यानुसार त्याच्या घरावर जप्तीची नोटीसही चिकटवण्यात आली आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Hardeep Singh Nijjar who was killed in Canada will seize his house in Punjab NIA Court Orders)

कॅनडात हत्या

दहशतवादी कारवायात गुंतलेल्या आणि कॅनडाचं नागरिकत्व घेतलेल्या निज्जरच्या हत्येवरुन सध्या कॅनडा आणि भारतातील संबंध तणावाचे बनले आहेत. यावरुन दोन्ही देशांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांनी यामध्ये कॅनडाची बाजू घेतल्यानं हा विषय आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला जात आहे. (Latest Marathi News)

कुटुंबावर कारवाईचा बडगा

दरम्यान, भारत निज्जर प्रकरणात आपल्या भूमिकेवर ठाम असून त्याच्या कुटुंबियांवरही कारवाईचा बडगा आता भारतानं उगारला आहे. त्यानुसार, मोहाली इथल्या एनआयए कोर्टाच्या आदेशानुसार, हरदीपसिंह निज्जर याच्या जालंधर जिल्ह्यातील भारसिंहपुरा गावातील घरावर जप्तीची नोटीस चिकटवण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)

निज्जर कोण आहे?

हरदीपसिंह निज्जर हा खलिस्तानी चळवळीचा नेता असून कॅनडाचा नागरिक होता. कॅनडातच एका गुरुद्वाराबाहेर त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पण या हत्येमागं भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत केला होता. त्यानंतर तातडीनं भारतानं या आरोपांना उत्तर दिलं होतं.

तसेच आधी कॅनडानं नंतर भारतानं कॅनडाच्या उच्चाधिकाऱ्यांची हाकालपट्टी करत त्यांना पाच दिवसांत भारत सोडण्याचे आदेश दिले होते. पण कॅनडाला निज्जरच्या हत्येची बातमी अमेरिकेनं दिल्याची नवी माहिती कॅनडियन माध्यमांच्या रिपोर्टिंगमधून समोर आली आहे. त्यामुळं अमेरिका देखील भारतासोबत डबल गेम खेळत असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 : पाकिस्तानी वंशांच्या क्रिकेटपटूला T20 World Cup साठी भारताने व्हिसा नाकारला; सोशल मीडियावर लिहितो की...

Belly Fat Reduction: पोटाची चरबी कमी करायची आहे? हार्वर्ड डॉक्टरांकडून जाणून घ्या डाएटचं बेस्ट फॉर्मुला

Latest Marathi News Live Update : जामडी गावात माजी सरपंचाच्या मुलाची धारदार शस्त्राने हत्या

Pandharpur Politics : 'आमदार आवताडेंनी पंढरपुरात भाजपचे सहा उमेदवार पाडले'; पराभूत महिला उमेदवाराच्या पतीचा गंभीर आरोप, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Shiv Thakare: अखेर त्या अफवा खोट्या ठरल्या; शिव ठाकरेने सांगितलं 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

SCROLL FOR NEXT