Haryana’s Additional Director General of Police allegedly shot himself, triggering shock across the police department and political circles.

 

esakal

देश

Haryana ADGP Suicide : खळबळजनक! हरियाणाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांची गोळी झाडून आत्महत्या

Haryana ADGP Suicide case : पत्नी आहे आयएएस अधिकारी ; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्टच

Mayur Ratnaparkhe

Haryana ADGP Shoots Himself : हरियाणा पोलिस विभागामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. हरियणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) वाय.एस. पूरन यांनी चंदीगडमध्ये स्वतःवर गोळी झाडून घेत, आत्महत्या केली आहे. ही घटना सेक्टर ११ मध्ये घडली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. तर, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, पूरन यांचा मृतदेह ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच, या आत्महत्येच्या घटनेचा तपास सुरू केला.

प्राप्त माहितीनुसार, त्यांच्या पत्नी आयएएस अधिकारी आहेत आणि सध्या जपानमध्ये मुख्यमंत्री नायब सैनी यांच्यासोबत सध्या कार्यरत आहेत. तर प्रशासनाने आणि पोलिसा विभागाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, एडीजीपी पूरन यांच्याकडे कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलिस घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

दरम्यान, या घटनेने पोलिस विभाग आणि राज्य प्रशासनात खळबळ उडाली आहे. एडीजीपी पूरन हे त्यांच्या कामासाठी आणि प्रामाणिकपणासाठी ओळखले जात होते. मात्र त्यांच्या अशाप्रकारे मृत्यूमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. आयपीएस वाय. पूरन कुमार हे हरियाणाचे २००१च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते.

तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आत्महत्येचे खरे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी सर्व शक्य बाजू तपासल्या जातील. याचबरोबर पोलिस आणि प्रशासनाने जनतेला अफवांकडे लक्ष देऊ नये असे देखील आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: कॅप्टनकूल आता 'ड्रोन पायलट'! CSK ला सोडून मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्रीच्या चर्चेदरम्यान धोनीचे नवे ट्रेनिंग पूर्ण

Ausa Accident : बहिणीला कॉलेजला सोडताना बहीण भावावर काळाचा घाला; कारच्या धडकेने भावंड ट्रकखाली सापडून जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : पंढरपूर: वारकऱ्यांना मारहाण, दोघांना अटक

इन्स्टाग्रामवर रिल्स अन् फोटो शेअर करताय? मग तुम्हालाही मिळू शकतो ‘Insta Rings’ पुरस्कार, काय आहे प्रोसेस? पाहा एका क्लिकवर

मी चित्रपट पाहिला नाही पण... मराठी 'दशावतार'च्या 'कांतारा'सोबत होणाऱ्या तुलनेवर नेमकं काय म्हणाला रिषभ शेट्टी?

SCROLL FOR NEXT