nuh clashes ANI
देश

Haryana Violence: हरियाणानंतर आता राजस्थानमध्ये कलम 144 लागू; दुकानांची तोडफोड

Haryana Violence : हरियाणाच्या नूह जिल्ह्यात सुरु झालेल्या हिंसाचाराचे पडसाद हळूहळू देशभरात उमटत असल्याचे चित्र आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sec 144 imposed in Rajasthan:

नवी दिल्ली- हरियाणाच्या नूह जिल्ह्यात सुरु झालेल्या हिंसाचाराचे पडसाद हळूहळू देशभरात उमटत असल्याचे चित्र आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली-फरिदाबाद हायवे ब्लॉक केला. त्यानंतर दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला.

दिल्लीच्या अनेक भागात मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला आहे. त्यातच आता राजस्थानच्या अलवार आणि भरतपूर जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आला आहे. राजस्थानच्या भिवाडी येथे तीन दुकानांवर हल्ला करण्यात आल्यानंतर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला.

हरियाणाच्या नूह जिल्ह्यात धार्मिक रॅलीवर झालेल्या दगडफेकीनंतर हिंसाचाराला सुरुवात झाली. 12 ते 15 जणांच्या जमावाने रॅलीवर दगडफेक केली, तसेच तेथे उभ्या असलेल्या वाहनांना पेटवून दिले. घाबरलेल्या जवळपास 2500 लोकांनी जवळच्या मंदिरात आश्रय घेतला. या लोकांची नंतर पाच तासांनी सुटका करण्यात आली.

सोमवारी (31 जुलै) सुरु झालेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. या हिंसाचाराचे लोन आता ईतर राज्यातही पसरताना दिसत आहे. राजस्थान मध्ये लोकांच्या संचारावर निर्बंध लादण्यात आले आहे. चार किंवा चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे.

अलवार जिल्हा प्रशासनाने 10 ऑगस्टपर्यंत 10 ठिकाणी कलम 144 लादण्याचा निर्णय घेतला आहे. भरतपूर जिल्हा प्रशासनानेही पुढील आदेशापर्यंत दोन तालुक्यात संचार बंदी केली आहे. राजस्थानच्या भिवाडी येथे तीन दुकानांची तोडफोड केल्याप्रकरणी 9 लोकांना ताब्यात घेण्यात आले. यात दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. जमावाने दोन मटन शॉप आणि एक कार रिपेअरिंग सेंटरची तोडफोड केली आहे. सर्व दुकाने मुस्लीम व्यक्तींच्या मालकीचे आहेत.

दरम्यान, हरियाणाच्या नूह जिल्ह्यात सुरु झालेला हिंसाचार गुरुग्राम जिल्ह्यातही पसरला आहे. आतापर्यंत 6 लोकांचा या हिंसाचारात मृत्यू झाला आहे. याप्रकरणात आतापर्यंत जवळपास दीडशे लोकांना अटक करण्यात आली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पोलिसफाटा तैनात करण्यात आलाय. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. तसेच हिंसाचारात दोषी असणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT