uttra pradesh hathras 
देश

धक्कादायक! हाथरसमध्ये मुलीची छेड काढल्याची केली तक्रार; वडिलांची गोळ्या घालून हत्या

सकाळ डिजिटल टीम

हाथरस - उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये आणखी एक धक्कादायक असा प्रकार घडला आहे. मुलीची छेड काढल्याची तक्रार केल्यानं वडिलांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं हाथरसमध्ये खळबळ उडाली आहे. नौरजपूर गावात एका तरुणाने सहकाऱ्यांसह 52 वर्षीय शेतकऱ्याची गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी पाठला आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या मुलीने 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मृत्यू झालेले शेतकरी अमरीष शर्मा यांनी 16 जुलै 2018 रोजी आरोपी गौरव विरोधात घरात घुसून माराहण आणि छेड काढल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आरोपीला 15 दिवस तुरुंगात ऱहावं लागलं होतं. तेव्हापासून गौरव कट रचत होता. तसंच तक्रार मागे घेण्याबाबत दबावही टाकण्याचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी जवळपास 4 च्या सुमारास अमरीष त्यांच्या शेतात काम करत होते. तेव्हा पत्नी आणि मुलगी जेवण देण्यासाठी आले असताना आरोपी त्याच्या दोन साथीदारांसह शेतात पोहोचले होते. त्यांनी शेतात येताच अमरीष यांच्यावर गोळीबार सुरु केला. 

गोळीबारामध्ये एका आरोपीलासुद्धा गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे. हल्लेखोरांनी जखमी आरोपीला गाडीत घालून तिथून पळ काढला. दरम्यान, घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अमरीष यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथं त्यांना मृत घोषित कऱण्यात आलं. 

मृत शेतकरी अमरीष यांच्या मुलीने पोलिसा तक्रार दाखल केली असून गौरव, रोहतास शर्मा, निखिल शर्मा, ललित शर्मा आणि इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT