HCL Tech Become India's Third largest company esakal
देश

विप्रोला मागे टाकत HCL Tech ठरली भारतातील तिसरी सर्वात मोठी IT कंपनी

HCLपेक्षा जुन्या विप्रो कंपनीला मागे टाकत एचसीएल देशातील तिसरी सर्वात मोठी IT कंपनी ठरली आहे.

सकाळ डिजिटल टीम

उद्योगक्षेत्रात जलद गतीने भरारी घेत एचसीएल भारतातील तिसरी सर्वात मोठी IT कंपनी बनली आहे. एचसीएलचा मागल्या चार वर्षाचा रिवेन्यू बघता शिव नादर यांची एचसीएल टेक्नॉलॉजीज गेल्या चार वर्षांपासून कमाईच्या बाबतीत भारतातील तिसरी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. (HCL Tech Become India's Third largest company)

विप्रोचा रिवेन्यू २.२ लाख कोटी असून विप्रोच्या तुलनेत HCL टेकने २.५ लाख कोटी रिवेन्यू जनरेट करत विप्रोला मागे टाकले आहे. असे असले तरी शेअर्सचा विचार करता HCL कंपनीचे शेअर्स घसरले असून सगळ्याच IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

विप्रो ही एचसीएलच्या तुलनेत जुनी कंपनी असून ०.३ लाख कोटींच्या तुलनेत एचसीएलने विप्रोला मागे टाकले आहे. विप्रो कंपनी १९४५ मध्ये उदयास आली होती. एचसीएलच कंपनी १९९१ साली उदयास आली. मार्केटमध्ये एचसीएलचे शेअर्स घसरले असून अनेक IT कंपन्यांची स्थिती सारखीच आहे. विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये मात्र सगळ्या कंपन्यांच्या तुलनेत जास्त घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमानमध्ये जहाजावर भारतीयाचा मृत्यू, प्लास्टिकमध्ये गुंडाळून थंड पाण्याच्या बाटल्यांनी झाकलं; मृतदेह सडू लागला, मदत मिळेना

Uddhav Thackeray: मातोश्रीवर बैठकीला ९ पैकी चौघेच आले, सर्वजण ठाकरेंसोबतच राऊतांचा दावा; तरीही ऑपरेशन टायगरची भीती

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

Pune Market Yard: पुणे मार्केट यार्डमध्ये केशर आंब्याला १६७ रुपये प्रतिकिलो भाव; पाच वर्षांतील सर्वोच्च विक्रम

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT