देश

अमरनाथ यात्रेवरील हल्ला मुस्लिम व काश्मिरींवर कलंक: मुफ्ती

वृत्तसंस्था

जम्मू - अमरनाथ यात्रेकरुंवर सोमवारी रात्री झालेल्या हल्ला हा काश्मीरी नागरिक आणि मुस्लिमांवर कलंक असल्याचे प्रतिक्रिया जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिली आहे.

अनंतनाग जिल्ह्यातील बांटिगू भागात अमरनाथ यात्रेवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात यात्रेकरू ठार झाले. यात पाच महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यात किमान 14 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर 'सीआरपीएफ'च्या जादा तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत. हल्ल्यानंतर मुफ्ती यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.

मुफ्ती म्हणाल्या, की अनंतनागमध्ये झालेला हल्ला हा सर्व मुस्लिम आणि काश्मीरी नागरिकांवर कलंक आहे. या हल्ल्यामुळे काश्मीरी नागरिकांची मान शरमेने झुकली आहे. अनेक अडचणी पार करून यात्रेकरू अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी काश्मीरमध्ये येत असतात. या हल्ल्याची निंदा करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मला आशा आहे, की सुरक्षा रक्षक आणि पोलिस हल्लेखोरांना पकडून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Cooperative Bank Profit: सामाजिक बांधिलकीसह आर्थिक बळकटी; राज्य सहकारी बँकेचा नफा ७०२ कोटींवर, सहकार क्षेत्रासाठी नवा आदर्श

Mumbai News: अफवांना पूर्णविराम! नव्या घरांचे स्वप्न आता हक्कासह पूर्ण होणार; धारावी प्रकल्पात मोठा ट्विस्ट

Pune Cyber Fraud: सायबर गुन्हेगारांचे पुणेकरांवर हल्ले तीव्र; शेअर ट्रेडिंग, मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्म व आयपीओ आमिषातून ९२ लाखांची लूट

Latest Marathi News Live Update: सोनं चोरीप्रकरणी तिघांना अटक

२ महिन्यात तुटलेलं मनोज बाजपेयी यांचं पहिलं लग्न; 'या' कारणामुळे पळून गेलेली पहिली पत्नी, नंतर मुस्लिम अभिनेत्रीने धरला हात

SCROLL FOR NEXT