Income tax raid on hero Motocorp chairman Pavan Munjal Sakal
देश

हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल याचं घर अन् कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल (Pavan Munjal) याच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल (Pavan Munjal) याच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. आयकर विभाग मुंजाल आणि कंपनीच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकत आहे. आयकर विभागाची कारवाई अजूनही सुरूच आहे. मुंजाल यांच्यावर आर्थिक अनियमिततेचा आरोप आहे.

हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांच्या गुरुग्राममधील निवासस्थानावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने बुधवारी छापे टाकले. आयकर विभाग मुंजाल आणि कंपनीच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जागेवरही छापे टाकत आहे. आयकर विभागाची कारवाई अजूनही सुरूच आहे. मुंजाल यांच्यावर आर्थिक अनियमिततेचा आरोप आहे. (Hero MotoCorp President Pawan Munjal's house and office raided by IT Department)

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांची एक टीम हिरो मोटोकॉर्पच्या कंपनीची आर्थिक कागदपत्रे आणि इतर व्यावसायिक व्यवहारांची चौकशी करत आहे. हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. हिरो मोटोकॉर्प आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दोन डझनहून अधिक ठिकाणांची झडती घेतली जात आहे. करचुकवेगिरीच्या संशयावरून शोध आणि जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.

हिरो मोटोकॉर्पने फेब्रुवारीमध्ये एकूण घाऊक विक्रीत 29 टक्क्यांनी लक्षणीय घट नोंदवली आहे. कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार, ऑटोमोबाईल कंपनीने 3,58,254 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 5,05,467 युनिट्स होती. देशांतर्गत विक्रीही फेब्रुवारी २०२१ मध्ये ४,८४,४३३ युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात ३१.५७ टक्क्यांनी घसरून ३,३१,४६२ युनिट्सवर होती. गेल्या महिन्यात मोटारसायकलची विक्री 3,38,454 युनिट्सवर होती, जी मागील वर्षी याच महिन्यात 4,63,723 युनिट्स होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT