Heroin worth Rs 700 crore seized Heroin worth Rs 700 crore seized
देश

तब्बल ७०० कोटींची हेरॉईन जप्त; अफगाणिस्तानातून आले १०२ किलो ड्रग्ज

सकाळ डिजिटल टीम

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी (ता. २४) अमृतसरमध्ये अफगाणिस्तानातून पाकिस्तान चेकपोस्टवरून येणारा ट्रक पकडला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या ट्रकमध्‍ये अधिकाऱ्यांना तब्बल ७०० कोटींचे १०२ किलो हेरॉईनची (Heroin) खेप सापडली. ही हेरॉईन दिल्लीतील एका आयातदाराने अफगाणिस्तानातून येणाऱ्या दारूच्या खेपेत लपवून ठेवल्याचे सांगितले जात आहे. ही कारवाई अटारी सीमेवर करण्यात आली. (Heroin worth Rs 700 crore seized)

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानातून आयसीपी अटारी येथे आलेल्या ट्रकच्या गोणीत दारूसह लाकूड ​​लपवले होते. तपासणी केली असता हे प्रकरण पुढे आले. काही लाकडांवर डाग दिसल्यानंतर अधिकाऱ्याला संशय आला. संशयाच्या आधारे कस्टम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पिशव्या उघडण्यात आल्या.

यावेळी लहान दंडगोलाकार छिद्र दिसले. या छिद्रांमध्ये हेरॉईन लपवण्यात आली होती. रात्रभर कस्टमचे पथक हेरॉईन बाहेर काढत राहिले. यावेळी पथकाला १०२ किलो हेरॉईन (Heroin) सापडले. आतापर्यंतची ही दुसरी सर्वांत मोठी कारवाई आहे. यापूर्वी २०१९ मध्ये आयसीपी अटारी येथे ५८४ किलो हेरॉईन पकडण्यात आली होती.

दारूची ही खेप अफगाणिस्तानातील (Afghanistan) मजार-ए-शरीफ शहरातून अलीम नजीर कंपनीने दिल्लीतील व्यापाऱ्याकडे पाठवली होती, असे सांगण्यात येते. त्यात हेरॉईन (Heroin) कोणी आणि कोणासाठी ठेवले होते, याचा तपास सुरू झाला आहे. या ३४० पोती दारू मजीठ मंडीशी संलग्न असलेल्या कस्टम हाउसच्या एजंटकडून प्राप्त करून दिल्लीतील व्यापाऱ्याकडे पाठवल्या जाणार होत्या. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : पूर्वजांच्या मोक्षासाठी आईनेच घेतला दोन लेकरांचा बळी, सासऱ्याच्याही हत्येचा प्रयत्न; धक्कादायक घटनेने सगळेच हादरले

Video : कलेचा होणार अपघात तर मालिकेत नवी एंट्री ! प्रोमो पाहून प्रेक्षकांनाही धक्का "कधीतरी चांगलं दाखवा"

Latest Marathi Live News Update : बहुतांश आदिवासी समाज शहरापासून दूर असल्याने विकास होणे गरजेचे- नितीन गडकरी

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवर आता 'डिजिटल' वॉच; प्रकल्पांसाठी पीएमआयएस प्रणाली कार्यान्वित करण्याचे आयुक्तांचे निर्देश!

Kolhapur News: गोकुळचा मोठा निर्णय! डिबेंचर व्यवहारांची पारदर्शकता राखण्यासाठी विशेष समिती; नविद मुश्रीफ यांची महत्वाची घोषणा

SCROLL FOR NEXT