High Alert in Odisha Because of Cyclone Fani Storm
High Alert in Odisha Because of Cyclone Fani Storm 
देश

Cyclone Fani : ओडिशात हायअॅलर्ट; उद्या धडकू शकतं सर्वात मोठं फनी चक्रीवादळ

सकाळवृत्तसेवा

भुवनेश्वर : जॉईंट टाईफून वॉर्निंग सेंटरच्या माहितीनुसार, फनी चक्रीवादळ हे गेल्या 20 वर्षातील आतापर्यंतचे सर्वात खतरनाक चक्रीवादळ असू शकतं. ओडिशात 1999 ला आलेल्या सुपर साइक्लोन वादळामुळे जवळपास 10 हजार लोक मृत्यूमुखी पडले होते. 

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या 43 वर्षात असे पहिल्यांदा होत आहे की एप्रिलच्या आसपास भारताच्या समुद्र किनाऱ्यालगत अशाप्रकारचे चक्रीवादळ उठले आहे. ओडिशाच्या दिशेने फॅनी 16 किमी प्रति तासाच्या गतीने येत आहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान देवस्थान पुरी येथील गोपालपुर ठिकाणापर्यंत पोहोचेल. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अतिसंवेदनशील जिल्ह्यातील जवळपास साडेअकरा लाख लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याचे प्रयत्न या भागात सुरु आहेत. आतापर्यंत साडेतीनलाख लोकांना सुरक्षित जागी पाठविण्यात यश आले आहे. 

कोणत्या 14 जिल्ह्यांना बसेल फनी चक्रीवादळाचा फटका? :
हे चक्रीवादळ दुपारपर्यंत पुरी येथे पोहोचेल. त्यानंतर पश्चिम बंगालकडे वळेल. या वादळाचा परिणाम आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू च्या उत्तर-पूर्व भागांत सुध्दा दिसेल. ओडिशाच्या 14 जिल्ह्यांवर थेट या चक्रीवादळाचा प्रभाव होईल. पुरी, जगतसिंहपुर, केंद्रपारा, बालासोर, भदरक, गंजम, खुर्दा, जाजपुर, नयागढ़, कटक, गाजापटी, मयूरभंज, ढेंकानाल आणि कियोंझार.

ओडिशात हायअॅलर्ट :
ओडिशात 24 तासांपर्यंत सर्व विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ईस्ट कोस्टर्न रेल्वे आतापर्यंत 103 गाड्या रद्द केल्या आहेत. 880 बचावकार्य कॅम्प उभारले आहेत. सर्व शिक्षण संस्था देखील बंद करण्यात आल्या आहेत. ओडिशातील 11 जिल्ह्यातील आचारसंहिता हटविण्यात आली आहे. लष्कर, हवाईदल आणि नौदलाला हायअॅलर्ट जारी केला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि ओडिशा आपत्ती वेगवान कृती दल (ओडीआरएफ) यांना ओडिशातील विविध संवेदनशील भागांत तैनात केले आहे. केवळ भुवनेश्वर येथे या दलांच्या 50 तुकड्या तैनात आहेत. वैद्यकीय व पोलिस क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करुन त्यांना तात्काळ सेवेत रुजू होण्याचे आदेश ओडिशा सरकारने दिले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT