high voltage drama lover proposes to girlfriend on 300 foot tower
high voltage drama lover proposes to girlfriend on 300 foot tower 
देश

प्रियकर 300 फूट उंच टॉवरवर चढून म्हणाला...

वृत्तसंस्था

रायपूर: अभिनेता धर्मेंद्र यांचा शोले चित्रपटातील डायलॉग सर्वांना माहित आहे. चित्रपटातील कथानकाप्रमाणेच एक प्रियकर 300 फूट टॉवरवर चढला. प्रेयसीसाठी बडबडू लागला. पोलिसांनी त्याची समजूत काढून खाली उतरवले आणि पाहूनचार दिला.

प्रियकर टॉवरवर चढल्याची चर्चा परिसरात चांगलीच रंगली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका युवकाचे गावातील एका युवतीवर एकतर्फी प्रेम होते. परंतु, ती त्याला टाळत होती. तिला वेगळ्या प्रकारे प्रपोज करण्यासाठी त्याने 'शोले' स्टाईल निवडली. प्रियकर 300 फुट टॉवरवर चढला आणि प्रेयसीकडे होकार मागू लागला. प्रियकर टॉवरवर चढल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थ गोळा झाले. होकार मिळाल्याशिवाय खाली येणार नसल्याचे सांगू लागला. ग्रामस्थ त्याला विनवणी करत होते. परंतु, तो ऐकायला तयार नव्हता. अखेर याबाबतची माहिती पोलिसांना समजली.

युवकाला खाली घेण्यासाठी तब्बल 112 पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनीही त्याला विनंती केली. पण, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पोलिसांनी होकार मिळवून देण्याचे आश्वासन देऊन खाली उतरवले. प्रियकर खाली आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पाहूनचार दिला. यामुळे शोले चित्रपटातील विरू आणि बंसतीची चर्चा परिसरात रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT