नवी दिल्ली- हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली होती. यावर सुक्खु यांनी स्वत:च खुलासा केला आहे. मला कोणी राजीनामा दिलेला नाही आणि मी राजीनामा दिला नाही, असं ते म्हणाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी ते बोलत होते.
मंत्री आणि आमदारांच्या नाराजीच्या वातावरणात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देतील अशी शक्यता निर्माण झाली होती. सायंकाळी काँग्रेस आमदारांची बैठक होईल. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (Himachal Pradesh CM Sukhwinder Singh Sukhu resigns Congress govt falls)
हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी मंगळवारी क्रॉस वोटिंग झाली. यात काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केलीये. त्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. त्यानंतर भाजप आमदारांनी सरकारकडे विश्वासदर्शक ठराव मांडण्याची मागणी केली होती. भाजप नेते जयराम ठाकूर यांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर भाजपच्या १५ आमदारांचे निलंबन देखील झाले होते.
काँग्रेस सरकारमधील मंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यानी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्री सुक्खू यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. इतर काँग्रेस आमदारांनी देखील मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केलीये. त्यानंतर काँग्रेस हायकंमांड सतर्क झाली. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुक्खू यांना राजीनामा मागितल्याचं कळत होतं. पण, काँग्रेसकडून याबाबत अधिकृत काही माहिती देण्यात आलेली नाही.
काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. आज रात्रीपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा नवा चेहरा जाहीर केला जाऊ शकतो. दुसरीकडे, भाजप आक्रमक झाली आहे. काँग्रेसचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी हल्लाबोल केला आहे. त्यामुळे येत्या काळात हिमाचल प्रदेशात काय घडामोडी घडतात हे पाहावं लागणार आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.