bhopal central jail  
देश

मुस्लिम बांधवांसाठी हिंदू बांधव उठतात मध्यरात्री...

वृत्तसंस्था

भोपाळ (मध्य प्रदेश): भारतामध्ये हिंदू-मुस्लिम बांधवांची एकजूट नेहमीच पाहायला मिळते. सध्या रजझानचा पवित्र महिना सुरू असून, मुस्लिमांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. मुस्लिम बांधवासांठी हिंदू बांधव मध्यरात्री उठून त्यांच्यासाठी जेवण तयार करत आहेत. ते पण भोपाळ मध्य कारागृहात.

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. या काळामध्ये हिंदू-मुस्लिम बांधव एकमेकांना मदत करतानाचे चित्र देशभरात पाहायला मिळत आहे. भोपाळ मध्य कारागृहात 150 हिंदू कैदी मुस्लीम कैद्यांसाठी मध्यरात्री तीन वाजता उठतात आणि न्याहरी तयार करतात. सायंकाळी सुद्धा इफ्तारीसह जेवणही हिंदू कैदीच तयार करत आहेत. सायंकाळी इफ्तारीची जबाबदारी हिंदू कैद्यांवर आहे. यामध्ये कलिंगड, फळे, खजूर आणि दूध दिले जाते. सायंकाळचे जेवणही हेच तयार करतात. जेवण बनविताना आणि नमाज अदा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. मुस्लीम कैद्यांना जेवणात वरण-भात, भाजी आणि पोळी दिली जाते. त्याचा रोजा सुरू असल्याने मुस्लीम बांधवांवर ताण येऊ नये यासाठी हिंदू बांधवांकडून या महिन्यातील संपूर्ण जेवणाची जबाबदारी घेतली जात आहे.

दरम्यान, या कारागृहात तब्बल 3000 कैदी आहेत. यापैकी 500 कैदी मुस्लीम आहेत. या सर्व मुस्लीम कैद्यांचा रोजा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : बुलढाण्यात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT