Kamlesh-Tiwari 
देश

Crime : हिंदू महासभेच्या माजी अध्यक्षाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या!

वृत्तसंस्था

लखनऊ : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची आज (ता.18) सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना लखनऊमध्ये घडली. यामुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून संपूर्ण लखनऊमधील बाजारपेठा आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तिवारी हे हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष होते.

कमलेश तिवारी यांच्या लखनऊमधील नाका भागातील कार्यालयात भगवे कपडे घातलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. तिवारींशी चर्चा केली, सोबत चहाही घेतला. त्यानंतर मिठाईच्या डब्यातून आणलेल्या चाकूने वार करून तसेच त्यांच्यावर गोळीबार करून तेथून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या तिवारींना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

डिसेंबर 2015 मध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कमलेश तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत तिवारींवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, असे आदेश दिले होते. 

दरम्यान, कमलेश तिवारी यांचा नोकर अर्धा तास 100 नंबर डायल करत होता. मात्र, त्याचा कोणाशी संपर्क होऊ शकला नाही. घटना घडल्यानंतर अर्धा तास उलटून गेल्यावर पोलिस पोहोचले, अशी माहिती तिवारी यांच्या नोकराने दिली.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT