BBC Documentary Supreme Court esakal
देश

BBC Documentary : भारतात BBC वर बंदी घालण्याची मागणी फेटाळली; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

रिट याचिका पूर्णपणे चुकीची आहे आणि त्यात कोणतीही योग्यता नाही, त्यामुळं ती फेटाळली जाते, असं खंडपीठानं म्हटलंय.

सकाळ डिजिटल टीम

डॉक्युमेंटरी ब्लॉक करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या स्वतंत्र याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं 3 फेब्रुवारीला केंद्र आणि इतरांकडं उत्तर मागितलं होतं.

नवी दिल्ली : भारतातील ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवर (BBC) पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) आज (शुक्रवार) फेटाळून लावली.

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठानं हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता आणि बिरेंदर कुमार सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला.

रिट याचिका पूर्णपणे चुकीची आहे आणि त्यात कोणतीही योग्यता नाही, त्यामुळं ती फेटाळली जाते, असं खंडपीठानं म्हटलंय. बीबीसी भारत आणि मोदी सरकार यांच्या विरोधात पक्षपात करत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील डॉक्युमेंटरी हा भारताच्या जागतिक उदयाविरुद्ध आणि पंतप्रधानांच्या विरोधात खोलवर रुजलेल्या कटाचा भाग आहे. 2002 च्या गुजरात हिंसाचाराशी संबंधित बीबीसीच्या डॉक्युमेंटरीमध्ये पंतप्रधान मोदींचा समावेश करणं ही त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार आहे. BBC कडून हिंदूविरोधी प्रचार केला जात आहे, असा याचिकेत आरोप करण्यात आलाय.

डॉक्युमेंटरी ब्लॉक करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या स्वतंत्र याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं 3 फेब्रुवारीला केंद्र आणि इतरांकडं उत्तर मागितलं होतं. याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं नोटीस बजावली होती. शिवाय, ज्येष्ठ पत्रकार एन राम, तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोईत्रा, वकील प्रशांत भूषण आणि अधिवक्ता एमएल शर्मा यांनी दाखल याचिका केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT