Plastic_Home 
देश

प्लॅस्टिकपासून बनवलेलं घर तुम्ही पाहिलं का? खर्च आला फक्त साडेचार लाख रुपये

वृत्तसंस्था

मंगळूर : प्लॅस्टिक फॉर चेंज इंडिया फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने (एनजीओ) पाचनाडी येथील लँडफिल साइटजवळ टाकलेल्या प्लॅस्टिकचा वापर करून कमला या सेवानिवृत्त महिलेसाठी ३५० चौरस फूट क्षेत्रावर विनामूल्य घर बांधले आहे. एनजीओचे संचालक चंदन एम.सी. यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कमला यांच्या घराच्या बांधकामासाठी आम्ही बटाटा चिप्स आणि ज्याचं रिसायकल करता येणार नाही, अशा प्लॅस्टिक रॅपर्सचा वापर केला आहे. गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने कमला यांच्या घराचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे एनजीओने त्यांना घर बांधून देण्यासाठी मदत करण्याचं ठरवलं. 

चंदन पुढे म्हणाले, कमलाचे घर बांधण्यासाठी एनजीओने हैदराबादस्थित बांबू हाऊसशी हातमिळवणी केली. त्यानंतर कचरा गोळा करणाऱ्यांकडून रॅग पिकर्स प्लॅस्टिकचे रॅपर्स गोळा केले आणि गुजरातमधील एका फर्मकडे पाठविले. त्या फर्मने रॅपर्सवर प्रक्रिया करून ८ मिमी ते २० मिमी जाडी असलेले पॅनेल तयार केले. आणि ते काँक्रिट फाउंडेशनवर फिट बसविण्यासाठी लोखंडी पट्ट्यांचा वापर केला. अशा प्रकारे आम्ही बांधलेले हे पहिले घर असून या घराचे आयुष्य ३० वर्षे आहे. घराच्या बांधकामासाठी एकूण १५०० किलो नॉन-रिसायकल प्लॅस्टिकचा वापर केला होता. अशा पद्धतीच्या घरांसाठी सौरऊर्जा कनेक्शन देण्यासाठीही एनजीओने तयारी दर्शविली आहे. 

घर बांधून २ महिने होऊन गेले असून या नव्या, हवेशीर घरात राहून मला खूप आनंद झाला आहे, असं कमला हसत हसत सांगत होती. गेल्या १५ वर्षांपासून कमला या भागात वास्तव्यास आहे. गेल्यावर्षी झालेल्या मुसळधार पावसात तिचे घर खराब झाले होते. आणि हे पाहून एनजीओने तिला तिच्यासाठी घर उभारण्याचे आश्वासन दिले होते. 

एनजीओ गेल्या वर्षभरापासून पाचनाडीमधील शंभरहून अधिक रॅग पिकर्स आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. आरोग्य आणि इतर गरजा भागविण्यासाठी एनजीओ या भागात कार्यरत आहे. फेब्रुवारीपासून एनजीओ या भागातील २० मुलांचे ऑनलाइन क्लास घेत आहे, असे चंदन यांनी सांगितले.

- जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर: सिव्हिल हॉस्पिटलमधील किमोथेरपी सेंटर अद्याप बंदच

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

Solapur politics: अजय दासरींनी युवती सेनेत लुडबूड करू नये: शिवसेना ठाकरे युवती सेना जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, पक्षात राहूनच पक्षाशी गद्दारी!

SCROLL FOR NEXT