MP Crime News Husband Kill SDM wife Sakal
देश

MP Crime News: महिला अधिकाऱ्याची पतीने का केली हत्या? वॉशिंग मशीनमुळे रहस्य उलगडलं!

MP Crime News Husband Kill SDM wife: मध्य प्रदेशच्या डिंरोरी जिल्ह्यातील शाहपुरामध्ये एका महिला उपविभागीय दंडाधिकाऱ्याचा (एसडीएम) मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृत्यूच्या २४ तासांत निशा नापित शर्माच्या हत्येचे रहस्य उलगडलं आहे.

कार्तिक पुजारी

भोपाळ- मध्य प्रदेशच्या डिंरोरी जिल्ह्यातील शाहपुरामध्ये एका महिला उपविभागीय दंडाधिकाऱ्याचा (एसडीएम) मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृत्यूच्या २४ तासांत निशा नापित शर्माच्या हत्येचे रहस्य उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती मनीष शर्मा याला अटक केली आहे. पोलिसांनी बेडशीट, उशी आणि वॉशिंग मशीनमध्ये असलेल्या कपड्यांच्या मदतीने हत्येचा कट समोर आणला आहे. (How a washing machine helped solve mystery sdm murdered by her husband MP crime news)

माहितीनुसार, निशाने पतीला सर्विस बुक, विमा आणि बँक रिकॉर्डमध्ये वारस केलं नव्हतं. याच्या रागातून मनीषने पत्नीची हत्या केली आहे. निशा शर्मा यांची अचानक हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. रिपोर्टनुसार, मनीषने आपल्या पत्नीला शाहपुरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. नाक आणि तोंडातून रक्त येत असल्याचं त्यानं कारण दिलं होतं. मात्र, हॉस्पिटमध्ये दाखल करण्याच्या आधीच निशा यांचा मृत्यू झाला होता.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

मनीषने चौकशीमध्ये सांगितलं होतं की, निशा यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं होतं की निशा यांचा मृत्यू चार ते पाच तास आधीच झाला होता. (MP Crime News Husband Kill SDM wife)

अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी याप्रकरणात गांभीर्याने चौकशी सुरु केली. फॉरेन्सिक टीमला एक बेडशीट, उशी आणि वॉशिंग मशीनमध्ये निशा यांचे कपडे सापडले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी मनीषला चौकशीसाठी बोलावलं. त्याला वॉशिंग मशीनमध्ये सापडलेल्या सामानाबाबत चौकशी केली. त्यानंतर मनीषने कबुल केलंय की त्याने तोंड दाबून पत्नीची हत्या केली आहे. हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी मनीषने निशा यांचे कपडे, उशी-बेडशीट वॉशिंग मशीनमध्ये टाकले होते. त्यानंतर कपडे वाळवल्यानंतर तिथेच ठेवले होते.

तीन वर्षांपूर्वी लग्न

माहितीनुसार, निशा शर्मा (५१) आणि प्रॉपर्टी डीलर मनीष शर्मा (४५) यांची एका ऑनलाईन मॅट्रिमोनी पोर्टलवरुन ओळख झाली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नापासूनच त्यांच्यामध्ये भांडण होऊ लागले. निशाने सर्विस बुक, विमा आणि बँकेसंबंधी कागदपत्रात नॉमिनी म्हणून मनीषचे नाव नोंदवले नव्हते. त्यामुळे मनीष चिडला होता. हुंडाबळी, पुरावे नष्ट करणे आणि इतर गुन्हेगारी कृत्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT